सेंट मेरी शाळेतील प्रसन्न हिंमत चौधरीचा नाशिक विभागात प्रथम क्रमांक
1 min read

सेंट मेरी शाळेतील प्रसन्न हिंमत चौधरीचा नाशिक विभागात प्रथम क्रमांक

Loading

नांद्री येथिल प्रगतीशिल शेतकरी श्री नानासाहेब ओंकार काळू चौधरी यांचा नातू चि . प्रसन्न हिंमत चौधरी हा सेंट मेरी इंग्लिश मेडिअम स्कूल मंगरूळ ता अमळनेर या शाळेत शिकत होता तो शालांत प्रमाणपत्र परीक्षा ( इयत्ता 10 वी) 2025 मध्ये 100% मार्क्स मिळवून नाशिक विभागीय मंडळातून प्रथम आला आहे
तो यापूर्वी इयत्ता 5 वी व 8 वी ला जवाहर नवोदय प्रवेश परिक्षा दोन वेळेस विशेष नैपुण्यासह उत्तीर्ण झाला आहे.तसेच त्याने पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती 2020परिक्षेत सुद्धा जिल्ह्यात 3 रा व माध्यमिक शिष्यवृत्ती परिक्षा 2023 मध्ये जिल्ह्यात प्रथम व राज्यात 20 वा क्रमांक मिळविला होता. तसेच त्याने विविध स्पर्धा व स्पर्धा परिक्षां मध्ये नेत्रदिपक यश संपादन कले आहे.
त्याच्या या यशाबदल सर्वक्षेत्रातून अभिनंदन केले जात आहे
त्याला या यशासाठी सेंट मेरी शाळेच्या आदरणीय प्राचार्या स्मिथा ॲन्थोनि तसेच सन्मानीय सर्व शिक्षकवृंद आणि आदरणीय श्री मोराणकर सर श्रीम.जोशी मॅडम व दक्ष टिटोरीयल चे श्री मोरेसर व उमर पिंजारी सर या सर्व सन्माननीय गुरुजनांचे अमूल्य मार्गदर्शन लाभले
तो श्री हिंमत ओंकार चौधरी मुख्याध्यापक जि प शाळा खवशी व सौ.निलम चौधरी प्राथमिक शिक्षिका मंगरूळ यांचा मुलगा व डॉ.सिद्धी चौधरी,डॉ.नयन चौधरी यांचा भाऊ आहे.
तो प्राथमिक शिक्षिका कवयित्री श्रीमती कुसुम चौधरी दोंडाईचा व माध्यमिक शिक्षक श्री.पराग चौधरी सर व श्री शैलेंद्र चौधरी सर व डॉ.सचिन चौधरी बहादरपूरकर यांचा भाचा आहे
त्याने भविष्यात अभियांत्रिकी शिक्षण घेवून देश सेवेचा मानस व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *