संत सखाराम महाराज पुण्यतिथीला वाडी चौकात रक्तदान शिबिर; २० रक्तपिशव्या संकलन  जायंट्स ग्रुपच्या पुढाकाराने ६०० रुग्णांचे मोफत उपचार व औषध वितरण, समाजसेवेचा गौरव!
1 min read

संत सखाराम महाराज पुण्यतिथीला वाडी चौकात रक्तदान शिबिर; २० रक्तपिशव्या संकलन जायंट्स ग्रुपच्या पुढाकाराने ६०० रुग्णांचे मोफत उपचार व औषध वितरण, समाजसेवेचा गौरव!

Loading

संत सखाराम महाराज पुण्यतिथीला वाडी चौकात रक्तदान शिबिर; २० रक्तपिशव्या संकलन

जायंट्स ग्रुपच्या पुढाकाराने ६०० रुग्णांचे मोफत उपचार व औषध वितरण, समाजसेवेचा गौरव!

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
संत सखाराम महाराज पुण्यतिथी( दिनांक 11मे 2025)निमित्ताने वाडी चौक ,भक्त निवास ,येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले ,या प्रोजेक्टचे चेअरमन जायंट्स संतोष हरी वाघ व डॉ महेश रमण पाटील हे होते. शिबिरात 20 रक्त पिशवी चे रक्तसंकलन करण्यात आले .या सोबतच जायंट्स सदस्यांनी ,नाव नोंदणी ,औषध वाटप यासाठी ही मदत केली , जायंट्स ग्रूप चे माजी सेक्रेटरी व औषध विक्रेता संघ अध्यक्ष जायंट्स प्रशांत भटू पाटील यांनी संघटने मार्फत मोफत औषध वाटप केले ,, रक्त संकलन मध्ये जायंट्स संस्थापक अध्यक्ष डॉ सुनील पंडितराव पाटील यांनी ही मदत केली, यावेळी जायंट्स माजी खजिनदार ॲड राजेंद्र चौधरी , जा.संजय मुंडके , सेक्रेटरी संदीप महाजन , उपाध्यक्ष डॉ महेश पाटील सर,महेश पाटील, प्रदीप शिंगाणे ,प्रशांत भटू पाटील ,जा.संतोष पाटील हे उपस्थित होते ,,
शिबिरास उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला यात ,600 रुग्णाचे रोग निदान करण्यात आले. तर 20 रक्त पिशवीचे संकलन करण्यात आले.
शिबीर आटोपल्या नंतर संत प्रसाद महाराज यांनी शाल व श्री फळ देऊन सर्व शिबिर आयोजका चा सत्कार केला,,
यात रोटरी ,लायन्स क्लब यांनी ही या कार्यात मदत केली ..असे जायंट्स ग्रूप चे अध्यक्ष सुनील पाटील यांनी वार्ताहरांशी बोलताना कळवले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *