जय योगेश्वर माध्यमिक विद्यालयाचा निकाल ९८.५५ टक्के*
![]()
*जय योगेश्वर माध्यमिक विद्यालयाचा निकाल ९८.५५ टक्के*
अमळनेर ,प्रतिनिधी : धनदाई माता एज्युकेशन सोसायटी संचलित अमळनेर येथील जय योगेश्वर माध्यमिक विद्यालयाचा निकाल ९८.५५ टक्के लागला आहे.
एस.एस .सी परीक्षेसाठी एकूण ६९ विद्यार्थी प्रवेशित होते.
त्यापैकी ६८ विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.
*प्रथम* युतिका गोरख ठाकरे (८९.२०%)जयश्री अरविंद वीरकर (८९.२०), *द्वितीय* लक्ष सुनील लोहार ,(८७.६०) *तृतीय* तन्वी राजेंद्र पवार (८७.२०), *चतुर्थ* हर्षल बनारायण पाटील(८६.६०), दुर्गेश जितेंद्र महाजन (८६.६०) टक्के गुण मिळवून उत्कृष्ट यश संपादन केले आहे.
विद्यालयाच्या या उज्वल यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब डी.डी. पाटील, उपाध्यक्ष तथा प्राचार्य रावसाहेब के.डी पाटील, संस्थेचे खजिनदार दादासो. शैलेंद्र पाटील, सचिव मामासो. राधेश्याम पाटील, संचालक बापूसो.एन. डी पाटील यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन केले आहे. तसेच शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर वृंद यांनी अभिनंदन केले आहे.

