“नुपूर कथ्थक अकॅडमीचे अमळनेर यात्रा उत्सवात मनमोहक कथ्थक प्रदर्शन, रसिकांचे मन जिंकले”
![]()
“नुपूर कथ्थक अकॅडमीचे अमळनेर यात्रा उत्सवात मनमोहक कथ्थक प्रदर्शन, रसिकांचे मन जिंकले”
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर — नुपूर कथ्थक डान्स अकॅडमी, भुसावळच्या विद्यार्थी आणि कलाकारांनी अमळनेर येथे आयोजित यात्रा उत्सवात मनमोहक कथ्थक नृत्य सादर करून सर्व रसिक प्रेक्षकांचे मन जिंकले. या उत्सवात विद्यार्थ्यांनी विविध थाटांच्या कथ्थक नर्तनातून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
परमपूज्य प्रसाद महाराज यांच्या चरणी आपली सेवा अर्पण करत सर्व कलाकारांनी त्यांचे आशीर्वाद प्राप्त केले. कार्यक्रमात ‘सुर निरागस हो’ कुमारी साक्षी कुलकर्णी, ‘पायोजी मैंने राम रतन’ कुमारी नुपूर भालेराव, ‘परमेश्वराय शशीशेखराय’ कुमारी उर्वशी कोळी, ‘शुद्ध कथक तीन ताल’ कुमारी नुपूर वाले राव आणि कुमारी डिंपल गाढे, ‘कृष्ण कीर्तन’ कुमारी यशस्वी पाटील, ‘शंकर अतिप्रचंड शिवस्तुती’ कुमारी डिंपल गाढे व साक्षी कुलकर्णी, तसेच ‘नटराज स्तुती’ कुमारी यशस्वी पाटील यांनी सुंदर नृत्यप्रदर्शन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व सहकारी कलावंतांनी ‘अभिर गुलाल’ या नृत्य प्रस्तुतीने रंगत वाढवली. या नृत्यसंधीचे दिग्दर्शन नृत्य शिक्षिका सौ. चारू भालेराव यांचे, तर संचलन रमाकांत भालेराव यांनी केले. सूत्रसंचालनात स्नेहा एकतारे यांनी आपली छाप सोडली.
या उत्कृष्ट कथ्थक सादरीकरणाने रास्त्या उत्सवाच्या औचित्याला अधिकच भव्यता प्राप्त झाली असून, प्रेक्षकांनी कलाकारांना आणि शिक्षकांना अनेक गोड शुभेच्छा दिल्या. नुपूर कथ्थक अकॅडमीच्या या नृत्यप्रदर्शनाने स्थानिक संस्कृती आणि कला क्षेत्राला नवे बल दिले आहे.

