“आदर्श हायस्कूल मांडळच्या माजी विद्यार्थ्यांचा आठवणींचा स्नेहमेळावा – 2001-02 बॅचचा उत्स्फूर्त संमेलन”
1 min read

“आदर्श हायस्कूल मांडळच्या माजी विद्यार्थ्यांचा आठवणींचा स्नेहमेळावा – 2001-02 बॅचचा उत्स्फूर्त संमेलन”

Loading

“आदर्श हायस्कूल मांडळच्या माजी विद्यार्थ्यांचा आठवणींचा स्नेहमेळावा – 2001-02 बॅचचा उत्स्फूर्त संमेलन”

अमळनेर प्रतिनिधी-तालुक्यातील मांडळ येथे आदर्श हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय मांडळ सन 2001 – 2002 दहावी च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा 9 मे 2025 रोजी रंगला. उपस्थित माजी विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. या कार्यक्रमाला 60 ते 65 विद्यार्थीनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमात आदर्श हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय मांडळ येथील मुख्याध्यापक बी. बी.चव्हाण सर, पुरकर सर,माळी सर, दोरीक सर, किरण सर, बी.बी. पाटील सर, व शिक्षकेत्तर कर्मचारी, यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पूरकर सर यांना देण्यात आले होते.कार्यक्रमाच्या वेळी पूरकर सरांनी व किरण सरांनी आपले मनोगत व्यक्त केले होते. कार्यक्रमाला सन 2001 – 2002 बॅच मधील विद्यार्थ्यांनी शाळेला प्रोजेक्टर देण्याचे संकल्प केला आहे.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *