शमिका अवसरमोल हिचे उज्वल यश !
![]()
शमिका अवसरमोल हिचे उज्वल यश !
(विशेष प्रतिनिधी )
युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सास अमेरिका येथे ” मास्टर इन इन्फॉर्मेशन सिस्टीम” या विषयात शमिका अवसरमोल हिला मास्टर डिग्री प्राप्त करण्यात आली. अमेरिकेतील टेक्सास विद्यापीठात पदवीदान समारंभ नऊ मे रोजी पार पडला.या समारंभात भारतीय विद्यार्थिनी कुमारी शमिका विजय अवसरमोल हिचा सन्मान करण्यात आला. शमिकाची आई ज्योत्स्ना व वडील विजय हे दोघेही व्यवसायाने शिक्षक आहेत. आपल्या मुलीला शिक्षणासाठी सतत प्रोत्साहन देत होते. उच्च शिक्षणासाठी आपल्या मुलीला अमेरिकेत पाठवण्याचा निर्णय त्यांनी घेतला. आपल्या यशामध्ये आई, वडील तसेच गुरुजनांचा फार मोठा वाटा आहे असे मत शमिकाने आमच्या प्रतिनिधीकडे व्यक्त केले. शमिकाचे माध्यमिक शालेय शिक्षण हे राजहंस विद्यालय मुंबई येथे झाले. समाजातील मान्यवर व्यक्तीने शमिकाचे या यशाबद्दल कौतुक केले आहे.

