UPSC परीक्षेसाठी भीती न बाळगता मोठी महत्वकांक्षा आणि जिद्द आवश्यक – आयुक्त विशाल मकवाने यांचा संदेश पूज्य साने गुरुजी स्पर्धा मार्गदर्शन कार्यशाळेच्या वर्धापन दिनानिमित्त अतिरिक्त आयकर आयुक्त विशाल मकवाने यांचा प्रेरणादायी व्याख्यान
![]()
UPSC परीक्षेसाठी भीती न बाळगता मोठी महत्वकांक्षा आणि जिद्द आवश्यक – आयुक्त विशाल मकवाने यांचा संदेश
पूज्य साने गुरुजी स्पर्धा मार्गदर्शन कार्यशाळेच्या वर्धापन दिनानिमित्त अतिरिक्त आयकर आयुक्त विशाल मकवाने यांचा प्रेरणादायी व्याख्यान
अमळनेर, प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
UPSC परीक्षेसाठी सामोरे जाताना मनातील भीती काढून एकाग्रतेने अभ्यास केला पाहिजे, महत्वकांक्षा मोठी असावी त्यादृष्टीने मनात आत्मविश्वास, जिद्द,कठोर परिश्रम घेतले पाहिजे आयुष्यात जे करायचं आहे ते डोक्यात फिट करून टाका असा सल्ला अतिरिक्त आयकर आयुक्त विशाल मकवाने साहेब यांनी तरुणांना दिला. पूज्य साने गुरुजी मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आयोजित दोन दिवशीय कार्यशाळेत ते बोलत होते.
यावेळी मंचावर मा.विशाल मकवाने ,अतिरिक्त आयकर आयुक्त नाशिक, मा. डॉ. डिगंबर महाले ,मंगळ ग्रह सेवा संस्था ,दत्तात्रय निकम पोलीस निरीक्षक अमळनेर, डॉक्टर अतुल सुर्यवंशी, डॉ.एस आर चौधरी, डॉ संदीप पाटील, दिलीप सोनवणे, अभय सोनार आदी उपस्थित होते. पूज्य साने गुरुजी मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र संचालक विजयसिंह पवार यांनी प्रास्ताविक व आभार मानले.

पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी धैर्य ,जिद्द चिकाटी ठेवा ,पुस्तकांशी मैत्री करा, कारण खरं ज्ञान पुस्तकात आहे. सोशल मीडियापासून विद्यार्थ्यांनी दूर राहावे.असे आवाहन केले.
या प्रसंगी डॉ. अतुल सूर्यवंशी सर यांनी ही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले म्हणाले की,अधिकारी होणे कठीण आहे. याबद्दल दुमत नाही परंतु अशक्य काहीच नाही. अधिकारी हा संस्कार शील झाला पाहिजे, अधिकारी लोकाभिमुख झाला पाहिजे, त्यांना लोकसेवक असल्याची जाणीव असली पाहिजे. असे प्रतिपादन केले.
याप्रसंगी विनोद जाधव सर पत्रकार अजय भामरे, सोपान भवरे, पंकज पाटील, नरेंद्र पाटील, राजेंद्र भावसार दीपक वाल्हे आदी उपस्थित होते तसेच या कार्यशाळेत तरुण,तरुणी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


