उभाठाचे  माजी उपजिल्हा प्रमुख डॉ राजेंद्र पिंगळे यांचा शिंदे सेनेत प्रवेश
1 min read

उभाठाचे माजी उपजिल्हा प्रमुख डॉ राजेंद्र पिंगळे यांचा शिंदे सेनेत प्रवेश

Loading

डॉ. राजेंद्र पिंगळे यांचा शिंदे सेनेत प्रवेश

अमळनेर :
येथील उबाठाचे माजी उपजिल्हाप्रमुख तसेच माजी उपनगराध्यक्ष डॉ. राजेंद्र पिंगळे यांनी पालकमंत्री तथा पाणी पुरवठा मंत्री नामदार गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत पाळधी येथे शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला. यावेळी शिवसेनेचे चिन्ह असलेला भगवा फटका देऊन त्यांचे स्वागत केले. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील यांनी अमळनेर नूतन तालुकाप्रमुख सुरेश पाटील यांना आदेशित केल्यानुसार त्यांनी पक्ष वाढीसाठी जोमाने काम सुरू केले आहे. त्यानुसार सुरेश पाटील व शहर प्रमुख संजय पाटील यांचे सोबत अमळनेर तालुक्यातील शिवसेना पक्ष वाढीसाठी त्यांनी प्रयत्न करावेत म्हणून शुभेच्छा दिल्यात. तसेच शिवसेनेचे अमळनेर तालुका संपर्क पालक आमदार दादासाहेब अमोल चिमणराव पाटील यांनीही शुभेच्छा देऊन सत्कार केला. डॉ राजेंद्र पिंगळे हे मितभाषी असून त्यांचा अमळनेर तालुक्यात जनसंपर्क दांडगा आहे. त्यांच्या पक्ष प्रवेशाने शिवसेना वाढीसाठी फायदाच होणार असून पक्षाला बळकटी मिळणार आहे, असे नूतन तालुका प्रमुख सुरेश पाटील यांनी म्हटले असून त्यांचे पक्षात स्वागत केले आहे. भविष्यात असे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करणार असून शिवसेना भगवामय केल्याशिवाय राहणार नाही, असेही यावेळी सुरेश पाटील यांनी प्रतिपादन केले.
सामाजिक कार्यकर्ते तथा माजी नगरसेवक विक्रांत पाटील, युवासेनेचे जिल्हाप्रमुख रोहित कोगटा, माजी सरपंच रवींद्र पाटील, उद्योगसेनेचे अमित ललवाणी आदी उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *