“सूर तेचि छेडिता महिला आर्केस्ट्रा”ची भक्तिगीतांनी भरलेली भावपूर्ण सेवा,  ह.भ.प.प.पू. सद्गुरु सखाराम महाराजांच्या उत्सव यात्रेत महिला आर्केस्ट्राचा गौरव
1 min read

“सूर तेचि छेडिता महिला आर्केस्ट्रा”ची भक्तिगीतांनी भरलेली भावपूर्ण सेवा, ह.भ.प.प.पू. सद्गुरु सखाराम महाराजांच्या उत्सव यात्रेत महिला आर्केस्ट्राचा गौरव

Loading

“सूर तेचि छेडिता महिला आर्केस्ट्रा”ची भक्तिगीतांनी भरलेली भावपूर्ण सेवा

ह.भ.प.प.पू. सद्गुरु सखाराम महाराजांच्या उत्सव यात्रेत महिला आर्केस्ट्राचा गौरव

अमळनेर प्रतिनिधी-ह.भ.प.प.पू.सद्गुरु सखाराम महाराज यांच्या उत्सव यात्रेच्या निमित्ताने “अमळनेर महिला मंच ट्रस्ट” संचलित “सूर तेचि छेडिता महिला आर्केस्ट्रा”च्या माध्यमातून वाडी संस्थान येथे पांडुरंगच्या गाभाऱ्यात भक्तिगीते गावून सेवा दिली.आर्केस्ट्रात वसुंधरा लांडगे यांनी “मनी नाही भाव म्हणे देव मला पाव”,मनीषा भांडारकर यांनी”धागा धागा अखंड विणूया”,शुभांगी खंडाळे यांनी “विठू माऊली तू माऊली जगाची”,जागृती केळकर यांनी “बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल “अशी अनेक दर्जेदार भक्तिगीते गायिली व रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.त्यांना साथसंगत हार्मोनियम कौस्तुभ जोशी,तबला श्रीपाद शिरवळकर,सिंथेसायझर केतन जोशी,ढोलकी अभिजित महाजन यांनी दिली.
सुरूवातीला पहेलगाम येथे आतंकवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात जीव गमावलेल्या निष्पाप पर्यटकांना भावपूर्ण श्रध्दांजली वाहिली व ही सेवा “ऑपरेशन सिंदूर “यशस्वी करण्यासाठी लढणाऱ्या तिन्ही दलातील जवान, देशाचे धाडसी व निडर पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी,गृहमंत्री मा.अमितजी शहा,संरक्षण मंत्री मा.राजनाथसिंह यांना पांडुरंगाने ऊर्जा द्यावी यासाठी समर्पित करण्यात आली.
यावेळी प.पू.सद्गुरु सखाराम महाराज (प.पू.प्रसाद महाराज)आणि नंदगांवचे श्रीरामभक्त प.पू.ईश्वरदासजी महाराज उपस्थित होते.आर्केस्ट्रातील गायक कलाकार महिलांचा महाराजांच्या हस्ते शेला देवून सत्कार करण्यात आला.सूत्रसंचलन आर्केस्ट्रा प्रमुख वसुंधरा लांडगे यांनी बहारदार केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ट्रस्ट च्या अध्यक्षा डाॅ.अपर्णा मुठे,उपाध्यक्षा तिलोत्तमाताई पाटील, सचिव सरोज भांडारकर, कोषाध्यक्षा कांचन शहा,सदस्या विद्या हजारे ,स्नेहा एकतारे,मेघा कुलकर्णी, चंदा वैद्य यांनी परिश्रम घेतले.ट्रस्ट च्या सभासद भगिनींनी उल्लेखनीय उपस्थिती दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *