धर्म रक्षणासाठी कार्य करणाऱ्या विभूती म्हणजे परमेश्वराचा अवतारच…. ज्येष्ठ समाजसेवक, प्रवचनकार , ह भ प डॉ.रवींद्र भोळे
![]()
धर्म रक्षणासाठी कार्य करणाऱ्या विभूती म्हणजे परमेश्वराचा अवतारच…. ज्येष्ठ समाजसेवक, प्रवचनकार , ह भ प डॉ.रवींद्र भोळे
दौंड मौजे बोरीयेंदी(बोरमलनाथ मंदिर): गीतेमध्ये चौथ्या अध्यायातील सातव्या व आठव्या श्लोकामध्ये परमेश्वराचे पृथ्वीतलावरील अवताराचे प्रयोजन का असते भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला विशद केले आहे. सज्जनांना दुर्जनांच्या जाच्यातून सोडवण्यासाठी , पापकर्म करणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी , धर्माची पुनरुत्थापना करण्यासाठी, अधर्माचा नाश करण्यासाठी, अविवेकाची काजळी घालविण्यासाठी, परमेश्वराला पृथ्वीतलावर अवतार धारण करतो. तसेच आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी परमेश्वर मानवाच्या रूपामध्ये धर्मधारणा करतो. धर्म धारणा करणे म्हणजेच परमेश्वराचे कार्य करणे होय. धर्माच्या रक्षणासाठी कार्य करणाऱ्या विभूती म्हणजेच परमेश्वराचा अवतार आहे ,असे मत ज्येष्ठ समाजसेवक, प्रवचनकार, हिंदू रत्न ह भ प डॉ. रवींद्र भोळे यांनी येथे व्यक्त केले. बोरिं येनदी येथे ग्रंथराज ज्ञानेश्वरी व गाथा पारायण, अखंड हरिनाम सप्ताहाच्या आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रवचन रुपी सेवेचे पुष्पगुताना ह भ प डॉ रवींद्र भोळे यांनी वरील विचार व्यक्त केले. आपल्या प्रवचनात ते पुढे म्हणाले की सत्ययुग, त्रेता युग, द्वापार युगामध्ये परमेश्वराचे अवतार झालेत. मात्र कलियुगामध्ये सुद्धा धर्म रक्षणासाठी, धर्म धारण करणारे परमेश्वराचे अवतार आहेत. मात्र ते सर्वसामान्य माणसाला ओळखणे शक्य नाही. यासाठी धर्म धारण करण्याची क्षमता असावी लागते, अध्यात्मिक प्रवृत्ती व सात्विक भाव असावा लागतो, असे मत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे आयोजन समस्त ग्रामस्थ वाडी वस्ती बोरीएं दि गाव, सर्व मान्यवर ग्रामस्थ यांच्यावतीने व वैकुंठवासी शंकर महाराज आखाडे यांच्या कृपाआशीर्वादाने व ह भ प गणेश महाराज आखाडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. याप्रसंगी ह भ प सुजल महाराज जगदाळे (भरतगाव,) ह भ प शेंबडे महाराज (आंबळे, )ह भ प दशरथ महाराज इंदलकर( वाघापूर,) ह भ प अस्मिता महाराज ताम्हाणे, ह भ प रवींद्र महाराज भोळे (उरुळी कांचन,) ह भ प मनोज महाराज वाघले , ह भ प बबन महाराज वेदपाठक (बोरी) यांची सुश्राव्य प्रवचने झाली. त्याचप्रमाणे ह भ प अशोक महाराज ताम्हणे, ह भ प वेदांत महाराज आखाडे, ह भ प कबीर महाराज आतार, ह भ प फरताळे महाराज, ह भ प अर्पिता ताई महाराज अमराळे, ह भ प नेहा ताई महाराज भोसले, ह भ प बाळासाहेब महाराज शिंदे यांची कीर्तने झाली. ह भ प गणेश महाराज वाघले यांचे काल्याचे किर्तन झाले. याप्रसंगी पंचक्रोशीतील भाविक भक्त वारकरी गावकरी यांना तीर्थप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला गावातील अनेक मान्यवर, भाविक भक्त, प्रतिष्ठित मान्यवर मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.


