जल जीवन मिशन अंतर्गत स्त्रोत बळकटीकरण व शाश्वतिकरण या विषयावर दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न
1 min read

जल जीवन मिशन अंतर्गत स्त्रोत बळकटीकरण व शाश्वतिकरण या विषयावर दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

Loading

जल जीवन मिशन अंतर्गत स्त्रोत बळकटीकरण व शाश्वतिकरण या विषयावर दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

अमळनेर प्रतिनिधी

पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग , मंत्रालय महाराष्ट्र शासन राज्य पाणी व स्वच्छता मिशन ( SWSM ), मुंबई जल जीवन मिशन मिशन स्तर 3 (टप्पा 4) जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, जिल्हा परिषद जळगांव यांच्या सहकार्याने व राष्ट्रविकास अॅग्रो एज्युकेशन संस्था अमळनेर मुख्य संसाधन संस्था अमळनेर( KRC) यांच्या मार्गदर्शनाखाली दोन दिवसीय पाणी पुरवठा योजनेशी निगडित स्त्रोत बळकटीकरण व शाश्वतिकरण या विषयक दोन दिवसीय ग्रामपंचात स्तरावरील प्रशिक्षण तालुक्यातील 119 गावातील ग्रामपंचात मधील या कार्यक्रमात ग्राम आरोग्य पोषण पाणी पुरवठा व स्वच्छता समितीचे अध्यक्ष (सरपंच) सह ग्राम आरोग्य पोषण पाणीपुरवठा व स्वच्छता समितीचे सदस्य त्या मध्ये मागासवर्गीय ( अजा/अज) समिती सदस्य, मध्ये ग्रा आरोग्य पोषण पाणी पुरवठा व स्वच्छता समिती( VWSC) महिला सदस्य यापैकी पाच प्रतिनिधींना प्रशिक्षण देण्यात आले आहे सदर प्रशिक्षण प्रसंगी विषय तंज्ञ साधन व्यक्ती यांच्याकडुन सदर प्रशिक्षण देण्यात येत आले सदर प्रशिक्षण दरम्यान मान्यवर यांच्या हस्ते प्रमाणपत्र , बॅग , पेन , पुस्तिका , नोटपॅड देखील प्रशिक्षणार्थी यांना वाटप करण्यात आले तसेच मार्गदर्शन देखील केले सदर प्रशिक्षण जिल्हा परिषद जळगांव मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्री मीनल करनवाल उपमुख्य कार्यकारी मा.श्री.सचिन पानझडे, क्षमता बांधणी तंज्ञ मनोहर सोनवणे , महेश सोनवणे गट विकास अधिकारी अमळनेर मा.श्री.एन आर पाटील ,विस्तार अधिकारी, बीआरसी ,सीआरसी तसेच राष्ट्रविकास संस्थेचे अध्यक्ष मा.श्री. भुपेन्द्र महाले यांच्या मार्गदर्शनाने सदर प्रशिक्षण सुरु आहे त्या प्रसंगी राष्ट्रविकास संस्थेचे प्रशिक्षक मुख्य प्रशिक्षक दिनेश पाटील , उमाकांत पाटील,अशोक पाटील तुषार पाटील तसेच सहाय्यक प्रशिक्षक रागिणी महाले,विद्या पाटील,ज्योती पाटील यांनी जल जीवन मिशन चा आढावा,समुदाय आधारित स्त्रोत व्यवस्थापन,भारतीय जल धोरण योजना आणि तंत्रे, भुजल व्यवस्थापन नियोजन व ओळख,भुजल पुनर्भरणाचे तंत्र,भूपृष्ठावरील पाण्याचा पुनर्भरण,नदी-नाले उपचार तंत्र हे विषय सविस्तर दोन दिवसात घेण्यात आले त्या प्रसंगी संस्थेचे नयना चौधरी, महेश माकडे ,राहुल सुर्यवंशी, सिमा महाजन, गोरख पाटील,स्वंप्निल पाटील,हिलाल पाटील,मुकेश पाटील, यांनी सदर प्रशिक्षण यशस्वीरित्या करण्यासाठी नियोजन केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *