अमळनेर – ख्वाजा नगरमध्ये मोफत हिमोग्लोबिन व रक्त शर्करा तपासणी शिबिर यशस्वी
![]()
अमळनेर – ख्वाजा नगरमध्ये मोफत हिमोग्लोबिन व रक्त शर्करा तपासणी शिबिर यशस्वी
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर येथील आधार बहुउद्देशीय संस्था संचलित विप्रो केअर सहायीत आधार शहरी आरोग्य प्रकल्पाच्या अंतर्गत नुकतेच शहरातील ख्वाजा नगर येथे मोफत हिमोग्लोबिन व रक्त शर्करा तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरात एकूण ६८ लाभार्थ्यांनी तपासणी करून आरोग्याची माहिती मिळवली.
शिबिरात प्रयोगशाळा तंत्रज्ञ अमोल शाहा, दीप्ती गायकवाड, योगिता पाटील आणि भारती सतदिवे यांसह तज्ञ उपस्थित होते, जे तपासणी सेवेत सहभागी झाले. या आरोग्य शिबिरामुळे स्थानिक नागरिकांना अत्यावश्यक चाचण्या मोफत मिळाल्या असून त्यांच्या आरोग्याबाबत जागरुकता वाढली आहे.
आधार संस्था व विप्रो केअर यांच्या संयुक्त उपक्रमामुळे चालू असलेल्या या शहरी आरोग्य प्रकल्पाचा सुदृढ आरोग्यसेवेचा उपक्रम म्हणून गौरव केला जात आहे. या प्रकारच्या उपक्रमांमुळे विशेषतः आर्थिक दृष्ट्या मागास असलेल्या नागरिकांना आरोग्य सेवा उपलब्ध होण्यास मदत झाली आहे.

