विलासराव पाटील यांचा षष्टब्दीपूर्ती गौरव समारंभ – सेवा आणि नेतृत्वाचा सन्मान धुळे येथे 11 मे रोजी आयोजित विलासराव मंदाकिनी शांताराम पाटील यांचा जंगी सत्कार कार्यक्रम
![]()
विलासराव पाटील यांचा षष्टब्दीपूर्ती गौरव समारंभ – सेवा आणि नेतृत्वाचा सन्मान
धुळे येथे 11 मे रोजी आयोजित विलासराव मंदाकिनी शांताराम पाटील यांचा जंगी सत्कार कार्यक्रम
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
विलासराव पाटील षष्टब्दीपूर्ती गौरव समितीतर्फे विलासराव मंदाकिनी शांताराम पाटील यांचे 61 व्या वर्षात पदार्पण निमित्त कार्य गौरव समारंभ
विलासराव मंदाकिनी शांताराम पाटील सेवानिवृत्त मुख्याध्यापक मनपा हायस्कूल धुळे
नियत वयोमानानुसार 31 मे 2023 रोजी सेवानिवृत्त झाले .त्यांनी सेवा काळात विविध संस्था संघटनेचे नेतृत्व करीत दिलेल्या बहुमोल योगदानाच्या प्रित्यर्थ त्यांच्या 3मे 2025 रोजी साठ वर्षे पूर्ण करीत असल्याने गौरव समितीने खालील मान्यवरांच्या उपस्थित 11 मे 2025 वार रविवार सकाळी 10 वाजता हिरे भवन स्टेशन रोड धुळे यथोचित गौरवाचा कार्यक्रम आयोजित केला आहे तरी कार्यक्रमास आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ सुधीरजी तांबे संगमनेर माजी पदवीधर आमदार नाशिक, कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ कैलास जी कुमोद नाशिक माजी अध्यक्ष महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळ यांच्या शुभहस्ते होणार आहे..
तर गौरवार्थी सत्कार खासदार धुळे लोकसभाचे डॉक्टर शोभाताई बच्छाव, माजी आमदार कुणाल पाटील यांच्या हस्ते विलासराव पाटील यांच्या जंगी सत्कार होणार आहे..
गौरविकेचे प्रकाशन एडवोकेट महेश गणगणे अकोला कार्याध्यक्ष अकोला जिल्हा काँग्रेस कमिटी, माजी राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय माळी महासंघ डी.के.माळी,
प्रा भानुदास माळी प्रदेश अध्यक्ष काँग्रेस ओबीसी विभाग, शिवदासजी महाजन पुणे राष्ट्रीय कार्याध्यक्ष अ.भा माळी महासंघ, तारकाताई विवरेकर राष्ट्रीय अध्यक्ष महिला आघाडी,, राजाभाऊ काठे नाशिक राष्ट्रीय उपाध्यक्ष अखिल भारतीय माळी महासंघ, हनुमंतजी वाडीले धुळे माजी नगराध्यक्ष धुळे, डॉ सुशील महाजन धुळे यांच्या शुभहस्ते गौरीविकेचे प्रकाशन होणार आहे..
या कार्यक्रमाला विशेष अतिथी व प्रमुख मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे गौरव समितीचे अध्यक्ष अविनाश पाटील अंधश्रद्धा निर्मूलन समिती,
कार्याध्यक्ष डॉ एस.टी पाटील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ सिनेट सदस्य, काशिनाथ माळी विश्वस्त ओबीसी असोसिएशन धुळे, सरचिटणीस प्रा डॉ संभाजी पाटील व उपाध्यक्ष व सदस्य यांनी केले आहे..
विलासराव पाटील यांची ग्रंथतुला करावयाची असल्याने शाल बुके हार श्रीफळ न आणता वाचनालयासाठी उपयुक्त असलेली पुस्तके ग्रंथ स्पर्धा परीक्षेची पुस्तके आणावी तसेच 200 पेजेस वहया आणावेत.. येथे जमा झालेली पुस्तके सावित्रीबाई फुले वाचनालय देवळी तालुका अमळनेर येथे व जमा झालेल्या वहया महानगरपालिका स्कूल धुळे येथील गरीब विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे असे गौरव समितीचे पदाधिकारी यांनी कळविले आहे..
तरी विलासराव पाटील षष्टब्दीपूर्ती गौरव
कार्यक्रमाला जळगाव धुळे नंदुरबार नगर नाशिक जिल्ह्यातील सर्व बंधू व भगिनी यांनी
विलासराव पाटील यांच्यावर प्रेम करणारे मित्रमंडळी यांनी आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन काशिनाथ माळी धुळे, ईश्वर महाजन अमळनेर, प्रवीण पाटील चोपडा, सतीश वैष्णव रावेर, यांनी केले आहे.

