आमदार मंगेशदादा चव्हाण यांचे सातत्यपूर्ण प्रयत्न; शेतकऱ्यांना 1.68 कोटींचा पांझण डावा कालव्याचा मोबदला
![]()
आमदार मंगेशदादा चव्हाण यांचे सातत्यपूर्ण प्रयत्न; शेतकऱ्यांना 1.68 कोटींचा पांझण डावा कालव्याचा मोबदला
चाळीसगाव प्रतिनिधी
– मा.आमदार महोदय श्री.मंगेशदादा चव्हाण यांनी तालुक्याच्या लोकहितार्थ सार्वजनिक कामासाठी सातत्याने केलेला पाठपुरावा व अथक प्रयत्नाने मौजे-कुंझर ता.चाळीसगांव येथील 43 शेतक-यांना पांझण डावा कालवा करीता संपादन झालेल्या शेतजमीनीचा अंतिम मोबदला र.रु.1,68,59,477/- रुपये मात्र संपादन संस्था कार्यकारी अभियंता धुळे मध्यम प्रकल्प विभाग धुळे यांचे कार्यालयाशी संपर्क साधुन प्राप्त करुन दिला आहे.
मौजे कुंझर येथील संपादीत जमीन मालक यांना दि.09.05.2025 रोजी मंजुर निवाडयानुसार मोबदला वाटप नोटीस प्रमोद हिले भुसंपादन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी चाळीसगांव यांचे मार्फत देण्यात आलेली आहे.
यावेळी तहसीलदार प्रशांत पाटील,तालुका कृषी अधिकारी अभिषेक लगड,महसूल सहायक गिरीश पाटील,तलाठी आनंद शिंदे हे उपस्थित होते.

