धुळे महाजन हायस्कूलमध्ये कै. बापूसाहेब अँड. संभाजीराव पगारे यांच्या निधनानिमित्त अखिल भारतीय माळी महासंघ व माळी समाज धुळे जिल्ह्याच्या वतीने भावपूर्ण शोकसभा
1 min read

धुळे महाजन हायस्कूलमध्ये कै. बापूसाहेब अँड. संभाजीराव पगारे यांच्या निधनानिमित्त अखिल भारतीय माळी महासंघ व माळी समाज धुळे जिल्ह्याच्या वतीने भावपूर्ण शोकसभा

Loading

धुळे महाजन हायस्कूलमध्ये कै. बापूसाहेब अँड. संभाजीराव पगारे यांच्या निधनानिमित्त अखिल भारतीय माळी महासंघ व माळी समाज धुळे जिल्ह्याच्या वतीने भावपूर्ण शोकसभा

धुळे प्रतिनिधी – काल धुळे येथील महाजन हायस्कूलमध्ये कै. बापूसाहेब अँड. संभाजीराव पगारे यांच्या निधनानिमित्त अखिल भारतीय माळी महासंघ व माळी समाज धुळे जिल्हा यांच्यावतीने शोकसभा आयोजित करण्यात आली. या शोकसभेचे अध्यक्षत्व धुळे नगर पालिकेचे माजी नगराध्यक्ष हनुमंत आप्पा वाडीले यांनी सांभाळले. शोकसभेत स्वर्गीय बापूसाहेब यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली.
शोकसभेत अनेक समाज बांधवांनी बापूसाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला. कै. बापूसाहेब हे निष्ठावंत कार्यकर्ता होते, जे राष्ट्रीय स्वयं संघ आणि अखिल भारतीय माळी महासंघ यासारख्या दोन संघटनांमध्ये काम करत, दोघांच्या कार्यात कधीही गोंधळ होऊ दिला नाही. बापूसाहेब एकनिष्ठ आणि दूरदृष्टीने विचार करणारे नेता होते, जे माळी समाजातील सर्व पोटजात विसरून समाजाच्या उन्नतीसाठी कार्यरत होते. त्यांच्या निधनाने माळी समाजाला मोठा तोटा सहन करावा लागला आहे.
शोकसभा मध्ये अण्णा माळी, एम. एच. पाटील, मिलिंद सोनवणे, बी. एच. जाधव, एस. टी. चौधरी, आर. के. माळी, संदीप माळी आणि अ.भा.माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष
विलासराव पाटील यांसारख्या अनेक मान्यवरांनी बापूसाहेबांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे व कार्याचे कौतुक केले. बापूसाहेबांच्या संघटन कौशल्याने आणि समाजसेवेने अनेकांना प्रेरणा दिली. त्यांनी शिक्षणासाठी आश्रम शाळा स्थापन केल्या आणि आदिवासी मुलांना शिक्षणाचा प्रवाहात आणण्याचा अद्भुत कार्य केले. सर्व पोटजातीत समता आणण्याचा त्यांनी नेहमी प्रयत्न केला.
बापूसाहेब यांनी नेहमी नम्रता आणि समाजसेवेचा आदर्श ठेवला. त्यांच्या अकाली निधनाने माळी महासंघाने आणि समाजाने एक मोठा स्नेह आणि मार्गदर्शक व्यक्तिमत्व गमावले आहे. त्यांच्या आठवणी मनाच्या कोपऱ्यात जपून त्यांचा कार्याचा वारसा पुढे नेत राहण्याचे सर्वांनी ठरवले.
शोकसभेचे सूत्रसंचालन काशिनाथ माळी यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री दिनेश खैरनार यांनी केले. शोक सभेत समाजातील सर्व पोटजातीत अनेक मान्यवर आणि समाज बांधव उपस्थित होते,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *