आंघोळीच्या आंदोलनातून प्रवीण पाटील यांचा पाणी समस्याचा नगरपालिकेला प्रभावी इशारा!
1 min read

आंघोळीच्या आंदोलनातून प्रवीण पाटील यांचा पाणी समस्याचा नगरपालिकेला प्रभावी इशारा!

Loading

आंघोळीच्या आंदोलनातून प्रवीण पाटील यांचा पाणी समस्याचा नगरपालिकेला प्रभावी इशारा!

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
अमळनेर शहरातील नागरिक पिण्याच्या पाण्याच्या गंभीर तुटवड्याने त्रस्त आहेत. पानपट्टी-घरपट्टी नियमित भरूनही अनेकांना पंधरा ते वीस दिवस पाणी मिळत नाही. शहरातील पाण्यासाठी लोकांची करांची भटकंती सुरू असून, अनेक प्रभागात समस्या असतानाही नगरपालिका दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला जात आहे. निवडणुकीच्या काळातच नगरसेवकांना मतदारांची आठवण येतो , असा लोकांचा संताप व्यक्त होतोय.
तांबेपुरा भागात ११ दिवसापासून पाणी न मिळाल्याने शिवसेना उपशहर प्रमुख प्रवीण पाटील यांनी अक्षय तृतीयेच्या दिवशी पालिकेच्या समोर आंघोळ करत अनोखे आंदोलन केले, अमळनेर तालुक्याचे आमदार अनिल पाटील यांनी लक्ष घालावे अशी त्यांनी मागणी केली आहे.. ज्यामुळे या गंभीर समस्येकडे प्रशासन आणि नागरिकांचे लक्ष वेधले गेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *