प्रा.डी.डी.पाटील हे लोकांतांत जगणारे व्यक्तिमत्त्व’ – प्रा.प्रकाश पाठक यांचे प्रतिपादन*
1 min read

प्रा.डी.डी.पाटील हे लोकांतांत जगणारे व्यक्तिमत्त्व’ – प्रा.प्रकाश पाठक यांचे प्रतिपादन*

Loading

‘ *प्रा.डी.डी.पाटील हे लोकांतांत जगणारे व्यक्तिमत्त्व’ – प्रा.प्रकाश पाठक यांचे प्रतिपादन*
————————————————-
● प्रा.डी.डी.पाटील यांचा अमृत महोत्सव
उत्साहात साजरा
● ७५ जोडप्यांचे सामाजिक सदभाव
गायत्री महायज्ञ
● मा.चंद्रकांत पाटील (उच्च शिक्षण मंत्री)
यांच्या कार्य गौरव संदेशाचे वाचन
दिनेश नाईक यांनी केले
● प्रा.डी.डी.पाटील यांच्या मानपत्राचे
वाचन ऍड.प्रदीप कुलकर्णी यांनी केले
————————————————-
अमळनेर : येथील ‘बजरंग पॅलेस’ मधील सभागृहात शुक्रवार, १८ एप्रिल २०२५ रोजी सेवानिवृत्त प्राध्यापक डी डी पाटील यांचा अमृत महोत्सव सोहळा पार पडला. यावेळी व्यासपीठावर सन्माननीय संजय पाचपोर
(अ.भा.संघटन मंत्री,सहकार भारती), बजरंगलाल अग्रवाल, प्रा.डी डी पाटील, सौ पाटील वहिनी,माजी प्राचार्य एस आर चौधरी, सी ए प्रा.प्रकाश पाठक आदी उपस्थित होते. सुरुवातीला भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.प्रा.डी डी पाटील यांच्या अमृत महोत्सवी वर्ष निमित्त त्यांचा भव्य असा सत्कार परिवाराचे सर्व सन्माननीय सदस्य, आयोजन समिती आणि स्नेही यांच्यामार्फत करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाच्या प्रारंभी सामाजिक सदभाव गायत्री महायज्ञ ठेवण्यात आले, या महायज्ञात ७५ जोडप्यांचा सहभाग महत्वाचा होता. यावेळी गायत्री परिवाराचे प्रा.नरेंद्र सोनवणे, राजमल बोरसे,छोटू टेलर व त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष सहकार्य केले.यावेळी विविध जाती-धर्मातील ७५ जोडप्यांच्या माध्यमातून सामाजिक सद्भभाव गायत्री महायज्ञ यावेळी पार पडले. तदनंतर प्रा.डी डी पाटील यांच्या कार्य गौरवाच्या संदर्भात उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करून डी डी पाटील यांच्या प्रति कृतज्ञता भाव व्यक्त केले. यामध्ये प्रामुख्याने पत्रकार शशिकांत घासकडबी, सुनबाई प्राजक्ता महाले, भाचे प्रा.जयदीप पाटील,मुलगी डॉक्टर जयमाला पाटील यांच्यासह वैयक्तिक पद्य सादर करणारे श्री प्रकाश ताडे तसेच यावेळी समरसता मंत्र सादर करणारे विजय पाटील यांनी कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतला. याप्रसंगी प्रा.जयदीप पाटील यांनी प्राध्यापक डी टी पाटील यांचे साधेपण, सर्वांना सांभाळून घेणारे व्यक्तिमत्व,संस्काराची शिदोरी देणारे व्यक्तिमत्त्व म्हणून प्रा.डी टी पाटील यांच्या कार्याचा गौरव केला.
आपल्या मनोगतात सी ए प्रा.प्रकाश पाठक सर यांनी अनेक विषयावर आपले मार्मिक व अभ्यासू विश्लेषण यावेळी केले.प्रकाश पाठक सर म्हणाले की, गुरु-शिष्याचं नातं हे प्रदीर्घ स्वरूपाचे आहे आणि ते वर्गाच्या पलीकडचे आहे. प्रा.डी डी पाटील हे अनासक्त जगणारे व्यक्तिमत्व आहे, या राष्ट्राचे चिंतन अध्यात्मवादी आहे म्हणून आपण काहीही करत नाही तर आपल्या क्रिया ज्या होतात आणि ज्या घडवून आणले जातात त्यामध्ये दैवी शक्ती आहे.प्रा.डी डी पाटील यांचे जीवन हे कर्तव्य पारायण स्वरूपाचे आढळतें. स्वार्थाच्या पलीकडे जगणं आणि काहीही न मिळवणार व्यक्तीमत्व म्हणून डी डी पाटील यांच्या नावाचा उल्लेख करणे आवश्यक आहे. त्यांचे खूप असे विचार व संस्कार हे अबोल असून ते प्रवाहित आढळतात.प्रा.डी डी पाटील हे निरूपद्रवी व्यक्तिमत्व आहेत. ‘असावे पण न दिसावे’ या विधानाप्रमाणे जगणारे व्यक्तिमत्व म्हणून डी डी पाटील सरांच्या उल्लेख कायम करता येईल. *प्रा.डी डी पाटील हे एकांतात जगणारे व्यक्तिमत्व नसून ते लोकांतात जगणारे व्यक्तिमत्व आहे* असे प्रकाश पाठक सरांनी यावेळी सांगितले.
आपल्या सत्कारास उत्तर देताना अगदी ७५ वर्षात आलेले अनुभव कथन केले, त्यांनी आपल्यापेक्षा वयाने लहान असले तरी ज्यांचे मार्गदर्शन मिळाले त्या सर्वांच्या प्रति कृतज्ञता भाव व्यक्त केले.प्रा.डी डी पाटील सरांनी नम्रपणे सर्वांच्या शुभेच्छा स्वीकारून विचार हे प्रवाहित कसे असले पाहिजे या संदर्भात मूल्य जोपासणारे मनोगत व्यक्त केले.
यावेळी प्रस्तुत अमृत महोत्सवी समारंभाच्या आयोजनाचे अध्यक्ष बजरंगलाल अग्रवाल, सचिव- माजी प्राचार्य एस आर चौधरी, संरक्षक- डॉ.चंद्रकांत पाटील,खासदार स्मिता ताई वाघ, प्राचार्य नरेंद्र पाठक,सदस्य- प्राचार्य ए बी जैन, राजेशजी पांडे, दिलीप रामू पाटील, शशिकांत घासकडबी,अशोकराव पाटील, सीए नीरज अग्रवाल, नरेंद्र निकुंभ, प्रा.मनोहर बडगुजर,विवेकानंद भांडारकर,ऍड.प्रदीप कुलकर्णी,प्रा.एस डी ओसवाल,माजी सिनेटर दिनेश नाईक, प्रा.देवेंद्र तायडे,प्रा.संजय सोनार, अनिल महाजन यांनी विशेष असे परिश्रम घेतले.
यावेळी सभागृहात माजी आमदार बी.एस. पाटील, व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा.शिवाजीराव पाटील, प्राचार्य एस एस राजपूत(शिरपूर), प्राचार्य संजीव गिरासे(म्हसदी),खानदेश शिक्षण मंडळाचे जेष्ठ संचालक योगेश मुंदडे,हरी भिका वाणी,प्रदीप अग्रवाल,उपाध्यक्ष माधुरीताई पाटील,विश्वस्त वसुंधराताई लांडगे,माजी संचालक प्रवीण जैन , प्रा.आर.आर.बहुगुणे,माजी प्राचार्य डॉ.एल ए पाटील, सेवानिवृत्त प्रा.आर.एन.भालेराव,अर्बन बँकेचे चेअरमन पंकज गोविंद मुंदडे,यांच्यासह महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील मान्यवर, प्राध्यापक, शिक्षक, मित्रपरिवार,विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रस्तुत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी सिनेटर दिनेश नाईक यांनी केले तर आभार माजी प्राचार्य एस आर चौधरी सर यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *