“प्रामाणिक तरुणाने सापडलेला मोबाईल आणि रोख रक्कम नातेवाईकांना केली परत, समाजासाठी आदर्श ठरला”*
![]()
*“प्रामाणिक तरुणाने सापडलेला मोबाईल आणि रोख रक्कम नातेवाईकांना केली परत, समाजासाठी आदर्श ठरला”*
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
अमळनेर तालुक्यातील धार येथून असलेला दुग्ध व्यवसाय करणारा कष्टकरी व प्रामाणिक तरुण, दिपक युवराज पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी रात्री ९.३० ते १० वाजताच्या सुमारास एका तरुणाचा २० हजार रुपये किंमतीचा मोबाईल आणि ५३८०० रुपये सापडले. दिपकने सदर तरुणाच्या नातेवाईकांशी संपर्क साधून त्यांना मोबाइल व पैसे ग्रामपंचायत कमिटीसमोर परत केले. अशा वेळी दिपक यांचा हा प्रामाणिकपणा आणि कष्ट करण्याची वृत्ती युवकांसाठी अनमोल प्रेरणा ठरली आहे. दिपक गेल्या ८-१० वर्षांपासून दूध वितरण करत असून त्यांच्या व त्यांच्या कुटुंबियांचे साने गुरुजी परिवार आणि निवृत्त मुख्याध्यापक एस. डी. देशमुख यांच्या कुटुंबाने सत्कार केला आणि त्यांना शुभेच्छा दिल्या.

