पेन्शन आदालतमध्ये निवृत्तीधारकांच्या प्रश्नांना प्राधान्य; नियमित आयोजनाची मागणी
1 min read

पेन्शन आदालतमध्ये निवृत्तीधारकांच्या प्रश्नांना प्राधान्य; नियमित आयोजनाची मागणी

Loading

पेन्शन आदालतमध्ये निवृत्तीधारकांच्या प्रश्नांना प्राधान्य; नियमित आयोजनाची मागणी

अमळनेर प्रतिनिधी :
जिल्ह्यातील निवृत्तीधारकांच्या विविध पेन्शनविषयक अडचणींचे निराकरण करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पेन्शन आदालत कार्यक्रमाला निवृत्तीधारकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. आज, दि. १९ जून रोजी आयोजित या कार्यक्रमात मुंबई येथील लेखा महानियंत्रक (AG) कार्यालयाच्या अधिकारी जया गोमेझ, अधिकारी माधव खैल तसेच सहाय्यक कृषी अधिकारी पटेल साहेब यांचे निवृत्तीधारकांच्या वतीने विशेष स्वागत करण्यात आले.

यावेळी कनिष्ठ महाविद्यालयीन संघटनेचे ज्येष्ठ मार्गदर्शक प्रा. सुनील गरुड, साने गुरुजी माध्यमिक विद्यालय, अमळनेरचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक एस. डी. देशमुख तसेच जळगाव जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष प्रा. विकास सोनवणे यांनी जळगाव जिल्ह्यातील सर्व ज्येष्ठ कर्मचाऱ्यांच्या वतीने उपस्थित अधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

कार्यक्रमाच्या माध्यमातून निवृत्तीधारकांच्या विविध समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने आणि ज्येष्ठ नागरिकांचा वेळ व श्रम वाचल्याबद्दल उपस्थितांनी आयोजकांचे अभिनंदन केले. यावेळी प्रा. सुनील गरुड यांनी निवृत्तीधारकांच्या हितासाठी महत्त्वपूर्ण मागणी मांडत, अशा प्रकारची पेन्शन आदालत दर तीन महिन्यांनी नियमितपणे आयोजित करण्यात यावी, अशी विनंती मुंबई AG कार्यालय तसेच जिल्हा कोषागार कार्यालयाकडे केली.

या कार्यक्रमाला जळगाव जिल्ह्यातील विविध तालुक्यांतून मोठ्या संख्येने निवृत्तीधारक उपस्थित होते. अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधून आपल्या शंकांचे निरसन करण्याची संधी मिळाल्याने उपस्थित निवृत्तीधारकांनी समाधान व्यक्त केले. पेन्शनधारकांच्या समस्यांवर त्वरित तोडगा काढण्यासाठी अशा उपक्रमांची नितांत गरज असल्याचे मतही यावेळी व्यक्त करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *