ऑलिंपिकचं स्वप्न शाळेतच पुसलं जातंय! – क्रीडा शिक्षणाची वेदना अधिवेशनात उघड
![]()
ऑलिंपिकचं स्वप्न शाळेतच पुसलं जातंय! – क्रीडा शिक्षणाची वेदना अधिवेशनात उघड
शिर्डी दि. १५: देशाला ऑलिंपिक पदकं मिळवून द्यायची असतील, तर त्याचा पाया शाळेतच रचावा लागतो. आणि हे काम फक्त शारीरिक शिक्षण शिक्षकच करू शकतात. पण दुर्दैव म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून शारीरिक शिक्षक भरतीच ठप्प आहे! ही खंत, संतापात व्यक्त करत शिर्डीतील क्रीडा महाअधिवेशनात १७ ठराव एकमुखाने मंजूर करण्यात आले.
राज्य क्रीडा उपसंचालक सुहास पाटील यांनी अधिवेशनाच्या समारोपप्रसंगी स्पष्ट सांगितलं, “शारीरिक शिक्षण हा प्रत्येकाच्या जीवनाचा भाग आहे. शाळांमध्ये हा विषय अधोरेखित व्हावा, यासाठी आपण सर्वांनी अभ्यासपूर्ण आणि एकजुटीने काम केलं पाहिजे.”
शारीरिक शिक्षकांची भरती थांबवली, खेळांचं भविष्य धोक्यात!–
संतप्त शिक्षकांनी सांगितलं की शाळांमधील क्रीडा वर्गच नामशेष होत चालले आहेत. विद्यार्थ्यांना मैदानं नाहीत, मार्गदर्शक शिक्षक नाहीत, मग खेळाडू तयार होतील कसे?
*ऑलिंपिक पदकांची हाक… पण शिक्षक कुठं?–
शिवछत्रपती पुरस्कार विजेते अशोक दुधारे यांनी ठाम मत व्यक्त करत सांगितलं की, “ऑलिंपिक खेळांना सवलती व प्राधान्य देणं आवश्यक आहे. जर आपल्याला पदकं हवी असतील तर खेळ संघटनांचं नेतृत्व त्या खेळातील तज्ज्ञ शिक्षकांच्या हातात द्यावं लागेल.”
क्रीडा शिक्षक म्हणतात: “आमच्याशिवाय पदकं फक्त स्वप्न”!
या अधिवेशनात विविध जिल्ह्यांतील क्रीडा शिक्षक, पत्रकार, संघटक आणि अधिकारी उपस्थित होते. १७ ठराव एकमताने मंजूर झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र कोहकडे यांनी केलं, तर आभार प्रदर्शन ज्ञानेश काळे यांनी केलं.
* राज्यभरातून आलेल्या शिक्षकांनी हे अधिवेशन यशस्वी करण्यासाठी मोठे योगदान दिले. मात्र या यशाआड दडलेली वेदना एकच – “आम्ही मैदानावर आहोत, पण शासनाच्या नजरेत नाही!”
क्रीडा उपसंचालक सुहास पाटील – “ऑलिम्पिक पदकाचा पाया रचण्याचे काम खऱ्या अर्थाने शारीरिक शिक्षण शिक्षकच करतात.याशिवाय शारीरिक शिक्षण हा प्रत्येक माणसाच्या जीवनातील अविभाग्य घटक आहे. प्रत्येक शाळेत शारीरिक शिक्षण विषय हा अधोरेखित राहिला हवा,त्यासाठी क्रीडा शिक्षकाची भुमिका फार महत्त्वाची ठरते.म्हणून इतर विषयांबरोबरच शारीरिक शिक्षण हाही विषय बहुमोलाचा आहे.गेली अनेक वर्ष शारीरिक शिक्षकांची भरतीच न झाल्यामुळे शारीरिक शिक्षकांचा वर्ग हळूहळू लोप पावत चालला आहे खंत याप्रसंगी त्यांनी व्यक्त केली. भविष्यात विषयाला वेगळीच दिशा देण्यासाठी आपणा सर्वांना अभ्यासपूर्ण व एकजुटीने काम करावे लागेल असे आवाहन राज्य क्रीडा उपसंचालक सुहास पाटील यांनी शिर्डीतील अधिवेशन समारोप प्रसंगी केले.
याप्रसंगी व्यासपीठावर अशोक दुधारे, विभागीय सचिव मच्छिंद्र कदम, शारीरिक शिक्षण शिक्षक समन्वय समिती अध्यक्ष विश्वनाथ पाटोळे,शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाचे राज्य अध्यक्ष राजेंद्र कोतकर , समन्वय समितीचे सरचिटणीस ज्ञानेश काळे,संजय पाटील शिवदत्त ढवळे, सहसचिव डॉ.जितेंद्र लिंबकर,डॉ.आनंद पवार,राजेश जाधव, प्रीतम टेकाडे, संजय चव्हाण,अमोल जोशी व इतर मान्यवर उपस्थित होते
सुत्रसंचलन राजेंद्र कोहकडे यांनी केले
फोटो कँप्शन
विधान परिषद सभापती प्रा राम शिंदे यांचा सन्मान करतांना राज्य क्रीडा संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कोतकर ,उपाध्यक्ष डॉ.आनंद पवार , नामदेव शिरगावकर आदी मान्यवर

