फार्मसी महाविद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती उत्साहात साजरी
1 min read

फार्मसी महाविद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती उत्साहात साजरी

Loading

फार्मसी महाविद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती उत्साहात साजरी

अमळनेर प्रतिनिधी
खान्देश शिक्षण मंडळ संचलित स्व. पंढरीनाथ छगनशेठ भांडारकर कॉलेज ऑफ डी.फार्मसी आणि स्व. प्रा. आर. के. केले कॉलेज ऑफ बी. फार्मसी, अमळनेर या महाविद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती अत्यंत उत्साहात आणि गौरवपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रविंद्र एस. सोनवणे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
प्राध्यापिका शिवानी शर्मा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे महिलांच्या शिक्षणासाठी व हक्कांसाठी केलेले अमूल्य योगदान स्पष्ट करताना, विशेषतः मुलींसाठी निर्माण केलेल्या शैक्षणिक आणि सामाजिक संधींबद्दल मोलाचे विचार मांडले.
यानंतर प्रा. सतीश ब्राह्मणे यांनी भारतीय संविधानाचे महत्त्व, त्यातील मुल्ये व त्याचा आजच्या समाजातील उपयोग यावर अभ्यासपूर्ण आणि प्रभावी भाष्य केले. संविधानामुळे मिळालेली स्वातंत्र्य, हक्क आणि समानतेची जाणीव त्यांनी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविली.
तसेच प्रा. देवेश भावसार यांनी आपले मनोगत व्यक्त करत डॉ. आंबेडकरांच्या विचारांची आजच्या काळात असलेली आवश्यकता अधोरेखित केली.
या कार्यक्रमात खान्देश शिक्षण मंडळाचे पदाधिकारी व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे अनुकरण करण्याचा निर्धार करावा असे मत फार्मसी महाविद्यालयाचे चेअरमन श्री. योगेश मुंदडे यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन प्रा. गीतांजली पाटील यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. प्रगती पाटील यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *