भारतीय संविधानामुळे भारतामध्ये समतावादी समाज व्यवस्था अस्तित्वात आली- प्रा. भरत शिरसाठ  *पाचोरा- भडगाव चे आमदार आप्पासाहेब किशोर पाटील यांची कार्यक्रमाला विशेष उपस्थिती*
1 min read

भारतीय संविधानामुळे भारतामध्ये समतावादी समाज व्यवस्था अस्तित्वात आली- प्रा. भरत शिरसाठ *पाचोरा- भडगाव चे आमदार आप्पासाहेब किशोर पाटील यांची कार्यक्रमाला विशेष उपस्थिती*

Loading

भारतीय संविधानामुळे भारतामध्ये समतावादी समाज व्यवस्था अस्तित्वात आली- प्रा. भरत शिरसाठ

*पाचोरा- भडगाव चे आमदार आप्पासाहेब किशोर पाटील यांची कार्यक्रमाला विशेष उपस्थिती*
………………………………………
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आयोजित प्रबोधन पर कार्यक्रमात व्याख्याते डॉ भरत शिरसाठ सर यांनी “भारतीय संविधान व बाबासाहेबांना अपेक्षित सामाजिक न्याय” या विषयावर अभ्यासपूर्ण मांडणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती प्रित्यर्थ आयोजित प्रबोधन कार्यक्रमात भडगाव या ठिकाणी केली. कार्यक्रमास विशेष अतिथी कार्यसम्राट आमदार आदरणीय किशोर आप्पासाहेब पाटील यांनी संबोधित करताना भडगाव शहरात सुंदर प्रशस्त विपश्यना केंद्र बनवण्याचे आश्वासन दिले… आपल्या विषयाची मांडणी करताना प्राध्यापक भरत शिरसाठ म्हणाले की भारतीय संविधानाने भारतीय समाजातील विषमतावादी व्यवस्था मोडीत काढली. संविधानाच्या कलम 14 अन्वये समानता प्रस्थापित केली. कलम 17 द्वारे देशातील अस्पृश्यता नष्ट केली. कलम 340, 341 व 342 द्वारा या देशातील बहुजन समाजाला नोकरी आणि शिक्षणामध्ये उचित प्रतिनिधित्व दिले. डॉक्टर आंबेडकर यांच्याकडे असणाऱ्या प्रचंड विद्वत्तेमुळे संविधान सभेमध्ये एक ज्ञानाचे वलय त्यांच्या विचारातून सभागृहाला दिसले आणि त्यातून प्रभावित होऊन संविधानाच्या संदर्भात संपूर्ण विश्वास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर टाकण्यात आला. जगातील बऱ्याच संविधानांचा अभ्यास असणाऱ्या विद्वान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या कठीण परिस्थितीमध्ये देशाला योग्य असणारे आणि दिशादर्शक असे संविधान तयार केले. त्यातून या नव्या भारताची निर्मिती झाली आहे, असे भरत शिरसाठ यांनी सांगितले. कार्यकमास समर्पण हॉस्पिटल चे डॉ निलेश पाटील. जाकीर कुरेशी इम्रान सय्यद अली योजनाताई पाटील..वाघ मॅडम निलेश मालपुरे .माजी नगरसेवक अहिरे…योगेश शिंपी टिकाराम सिंग पाटील गणेश पाटील. रजनीताई देशमुख कॉलेज चे. कोळी सर मराठे सर . बाळा गायकवाड भारतीय बौद्ध महासभा पदाधिकारी दिनकर वाल्हे .. प्रा. भैसे सर, भालेराव सर, छाया विऱ्हाडे मॅडम, केंद्रप्रमुख खेडकर साहेब, पवार सर, जुलाल सोनवणे, धम्मपाल सुरवाडे, गौतम बाविस्कर, रवी जाधव, नाना सोनवणे,सपकाळे सर इ. अनेक मान्यवर उपस्थित होते. तालुका अध्यक्ष रेखा वाल्हे मॅडम व यशराज निकम यांनी सहकार्याबद्दल सगळ्यांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *