मराठा महिला मंडळाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन!
1 min read

मराठा महिला मंडळाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन!

Loading

मराठा महिला मंडळाच्या वतीने
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन!

अमळनेर प्रतिनिधी
१४ एप्रिल रोजी, मराठा महिला मंडळाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अमळनेरमध्ये विशेष समारोह आयोजित करण्यात आला. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास फुलहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी शरदचंद्रजी पवार गटाच्या राज्य महिला प्रमुख तिलोत्तमाताई पाटील यांनी पुतळ्यास फुलहार अर्पण केला, तर मराठा महिला मंडळाच्या अध्यक्षा प्रा. शीला पाटील यांनी त्यांना माल्यार्पण करत अभिवादन केले.
या कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यावर प्रकाश टाकण्यात आला आणि त्यांच्या विचारांची महत्त्ता सर्वांना पटवून देण्यात आली.
या विशेष कार्यक्रमात उपस्थित होते:
सौ. तिलोत्तमा ताई पाटील (शरदचंद्र पवार गटाच्या महिला राज्य प्रमुख तथा मराठी महीला मंडळाच्या संचालिका),प्रा. शीला पाटील (मराठा महिला मंडळाच्या अध्यक्षा),माधुरी पाटील (उपाध्यक्षा) ,पद्मजा पाटील(कोषाध्यक्ष)
आधार संस्थेच्या अध्यक्ष डॉभारती पाटील ,
कृपाली पाटील, आरती पाटील, भारती शिंदे, सुरेखा पाटील आणि इतर महिला मंडळाच्या सदस्य उपस्थित होते.
महिला मंडळाच्या या उपक्रमामुळे एकजुट, जागरूकता आणि समानता याबद्दलचा संदेश पसरला आहे!..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *