विद्यार्थ्यांसाठी दिपक पाटील यांचा आक्रमक पवित्रा!
1 min read

विद्यार्थ्यांसाठी दिपक पाटील यांचा आक्रमक पवित्रा!

Loading

 

विद्यार्थ्यांसाठी दिपक पाटील यांचा आक्रमक पवित्रा!

अमळनेर प्रतिनिधी
जळगांव जिल्हा अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य स्टुडंट्स असोसिएशनचे दिपक पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. त्यांनी वाघोदे ग्रामपंचायतीच्या निधीतील घोटाळे आणि विद्यार्थ्यांच्या व्यायाम शाळेच्या प्रकल्पाबाबत त्रासदायक बाबी समोर आणल्या आहेत. दोन वर्षांपूर्वी भूमीपूजन झालेल्या व्यायाम शाळेच्या कामाची सुरुवात झाली नाही, याबाबत दिपक पाटील यांनी चिंता व्यक्त केली.
दिपक पाटील यांची योजना आहे की, विद्यार्थ्यांच्या हितासाठी लवकरच माहितीचा अधिकार (RTI) अर्ज दाखल करणार आहेत. “गोरगरीब मुलांची भरतीसाठी तयारी करणे आवश्यक आहे, पण त्यांच्या सुविधांचा अभाव असून, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत,” असे दिपक पाटील म्हणाले.
बाळासाहेब ठाकरे गटाच्या महिला प्रमुख शुभांगी ताई पाटील यांच्याशी चर्चा करतांना त्यांनी विश्वास व्यक्त केला की, “विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी व विविध भरतीसाठी लागणाऱ्या सुविधांचा पुरवठा करण्यासाठी मी कटिबद्ध आहे.”
दिपक पाटील यांचे गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी महत्वाकांक्षी विचार आणि त्यांच्या कार्यशक्तीमुळे विद्यार्थ्यांच्या जीवनात आशा आणि बदलाची चाहूल लागली आहे. त्यांच्या या पुढाकारामुळे अमळनेर तालुक्यातील विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास उंचावला जाईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *