महिला पत्रकारावर चिपळूणमध्ये जीवघेणा हल्ला*
1 min read

महिला पत्रकारावर चिपळूणमध्ये जीवघेणा हल्ला*

Loading

*महिला पत्रकारावर चिपळूणमध्ये जीवघेणा हल्ला*

“चिपळूण न्यूज” या युट्यूब चँनलच्या संपादिका स्वाती हडकर यांच्यावर काल रात्री चिपळूण येथे वाळू माफियांनी जीवघेणा हल्ला केला असून त्यांना जखमी अवस्थेत चिपळूण येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे..
त्यांच्यावर उपचार सुरू आहेत..
चिपळूण येथे मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर रेती उपसा केला जातो.. या वाळू माफियांना राजकीय व्यक्तींचा वरदहस्त असल्याचे बोलले जाते.. स्वाती हडकर यांनी मात्र सातत्याने या रेती माफियांच्या विरोधात लिखाण केले.. याबद्दल हितसंबंधियांच्या मनात राग होताच.. काल रात्री हडकर रेती उत्खनन सुरू होते तेथे पोहोचल्या..आणि आपल्या कँमेरयातून घटनेचं चित्रिकरण करू लागल्या..
तेव्हा त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आला..
पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती आणि अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेने घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला असून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *