शिरुडमध्ये वाय-फाय युक्त आधुनिक अभ्यासिकेचे उद्घाटन
1 min read

शिरुडमध्ये वाय-फाय युक्त आधुनिक अभ्यासिकेचे उद्घाटन

Loading

शिरुडमध्ये वाय-फाय युक्त आधुनिक अभ्यासिकेचे उद्घाटन

अमळनेर प्रतिनिधी – “गाव करी ते राव काय करी?” या उक्तीच्या पार्श्वभूमीवर नव तर तरुणांनी एकत्र येत अभ्यासिका सुरू करण्याचा निर्णय घेतल्यामुळे शिरूड (ता. अमळनेर) येथे महत्त्वाची उकल झाली आहे. अनेक दानशूर व्यक्तींच्या सहाय्याने अमळनेर तालुक्यात वाय-फाय युक्त आधुनिक अभ्यासिका तयार करण्यात आली आहे, ज्यामुळे गावातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत उच्च पदांवर पोहोचू शकतील.

अभ्यासिकेचा शुभारंभ

या अभ्यासिकेच्या उद्घाटन सोहळ्यात “श्री.छत्रपती शिवाजी महाराज ध्येयपूर्ती अभ्यासिका”चे भव्य उद्घाटन रविवारी मोठ्या थाटात करण्यात आले. या कार्यक्रमाचे सर्वेसर्वा म्हणजे शारदा मॅथ्स क्लासेसचे संचालक गौरव महाले आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक तसेच व्हाईस ऑफ मीडियाचे तालुकाध्यक्ष उमेश काटे यांच्या हस्ते फीत कापून अभ्यासिकेचे लोकार्पण करण्यात आले.
उद्घाटन समारंभाच्या कार्यक्रमामध्ये उत्कर्ष एक सामाजिक जाणीव फाउंडेशनचे खजिनदार योगेश्वर पाटील, सदस्य दीपक भोई, शिरूडचे सरपंच गोविंदा सोनवणे, उपसरपंच कल्याणी पाटील, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन बापूराव महाजन, बाजार समितीचे माजी संचालक डी ए धनगर, इंजि. प्रफुल्ल पाटील, कल्पेश माळी आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.

विद्यार्थ्यांचा मान आणि प्रेरणा

या सोहळ्यात पोलिस भरतीत निवड झालेल्या गौरव सुनील पाटील व ‘सीआय एसएफ’ मध्ये निवड झालेल्या सतीश खंडू पाटील यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. अभ्यासिकेसाठी विशेष मेहनत घेणारे कीरण पाटील आणि डी ए धनगर यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
गौरव महाले यांनी विद्यार्थ्यांना जीवनात मोठे स्वप्न पाहण्याचे आव्हान केले आणि दातृत्वातून उभारलेल्या अभ्यासिकेच्या माध्यमातून भविष्यात स्पर्धा परीक्षेत मोठ्या पदांवर जाऊन दातृत्वाची परतफेड करण्याचे आवाहन केले.

जिद्द आणि मेहनत

पत्रकार उमेश काटे यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की, स्पर्धा परीक्षेच्या कठीण मार्गावर जातांना जिद्द आणि चिकाटीच्या साथीत कठोर परिश्रमाची जोड दिली तर यश आपोआप मिळेल. यावेळी त्यांनी अभ्यास करतांना सोशल मीडियापासून दूर राहण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाचा समारोप

कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपक्रमशील शिक्षक डी ए धनगर यांनी केले, तर सूत्रसंचालन कल्पेश पाटील यांनी केले. आभार व्यक्त करण्याची जबाबदारी किरण पाटील यांनी घेतली.
अभ्यासिकेच्या माध्यमातून गावातील तरुण पिढीसाठी एक प्रभावी मंच उपलब्ध होत आहे, ज्यामुळे त्यांना त्यांच्या शैक्षणिक उद्दिष्टांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल. या उपक्रमामुळे गुणवान विद्यार्थ्यांच्या भविष्याकडे एक सकारात्मक दृष्टिकोन उभा करण्यात येईल, यावर उपस्थित सर्व मान्यवरांनी विश्वास व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *