“साळवे इंग्रजी विद्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन* !
![]()
*साळवे इंग्रजी विद्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन* !
साळवा प्रतिनिधी
साळवा तालुका धरणगाव येथील साळवे इंग्रजी विद्यालय व कनिष्ठ , महाविद्यालयात आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एस डी मोरे होते. ते म्हणाले डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारताच्या घटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात. विचारांचे तेजस्वी सूर्य, अन्यायाविरुद्ध झगडणारे वीर आणि शिक्षणाला जीवनाचे अंतिम ध्येय मानणारे महामानव, असे त्यांचे वर्णन करता येईल. त्यांचे संपूर्ण आयुष्य शिक्षणासाठी चाललेला एक ज्ञानयज्ञ होता. हा यज्ञ स्वतःच्या शिक्षणासाठी, समाजाच्या जागृतीसाठी आणि एका नव्या भारताच्या निर्मितीसाठी होता. त्यांचे नाव उच्चारले की समतेचा दीप, अन्यायाविरुद्ध लढा आणि सामाजिक क्रांतीचे वादळ डोळ्यासमोर उभे राहते. शिक्षण हीच खरी मुक्ती असे बाबासाहेबांचे ठाम मत होते. असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी ओघवत्या भाषेत सुंदर असे बाबासाहेबांचे चरित्र भाषणामध्ये सांगितले. भावेश अहिरे या विद्यार्थ्याने सुंदर असे सुरेल आवाजात बाबासाहेबांचे गीत गायन केले. विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन आर पी नेहेते मॅडम यांनी केले. त्यांनी सांगितले की बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला संदेश शिका, संघटित व्हा, संघर्ष करा ही केवळ घोषणा नव्हे तर क्रांतीची गाथा आहे. यात शिक्षण हेच परिवर्तनाचे पहिले पाऊल आहे. हे अधोरेखित होते. शिक्षण हेच खरे शस्त्र आहे, कारण तेच माणसाला गुलामगिरीच्या साखळ्या तोडून आत्ममुक्ती कडे घेऊन जाते. असे सांगितले.
याप्रसंगी ज्येष्ठ शिक्षिका गुणवंती पाटील, प्रतिभा पाटील, पौर्णिमा वारके, वर्षा नेहेते, जयश्री कोल्हे, कांचन अत्तरदे व शिक्षक श्री ए वाय शिंगाणे, एस व्ही राठोड, एस पी तायडे,आणि शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

