हनुमान जन्मोत्सवानिमित्त श्री मंगळग्रह मंदिरात याग,  नऊ यजमानांच्या हस्ते सपत्नीक पूजा-विधी
1 min read

हनुमान जन्मोत्सवानिमित्त श्री मंगळग्रह मंदिरात याग, नऊ यजमानांच्या हस्ते सपत्नीक पूजा-विधी

Loading

हनुमान जन्मोत्सवानिमित्त
श्री मंगळग्रह मंदिरात याग

नऊ यजमानांच्या हस्ते सपत्नीक पूजा-विधी

अमळनेर प्रतिनिधी

येथील श्री मंगळग्रह मंदिरात आज १२ एप्रिल रोजी हनुमान जन्मोत्सवानिमित्त हनुमान यागाचे आयोजन करण्यात आले. विविध क्षेत्रांतील नऊ यजमानांच्या हस्ते सपत्नीक हा पूजा-विधी पार पडला.

याप्रसंगी गणपती पूजन, पुण्याहवाचन, मातृका पूजन, सर्वतोभद्र मंडल, नवग्रह मंडल स्थापन, रुद्रकलश पूजन, श्री पंचमुखी हनुमंत महाभिषेक पूजन, नवग्रह पूजन, सुंदरकांड हवन, दशदिग्पाल, क्षेत्रपाल पूजन झाले. त्यानंतर वसोरधारा, पूर्णाहुती होऊन पूजन संपन्न झाले. तसेच हनुमंतांची स्तुतीपर गीतेही म्हणण्यात आली.

यावेळी हनुमंतांची प्रतिमा लावून आकर्षक सजावट करण्यात आली होती. सायंकाळी उभयतांच्या उपस्थितीत महाआरती होऊन भाविकांना विशेष प्रसाद वाटप करण्यात आला.

भिला गंगाराम पाटील, निलेश दहिवदकर, गुणवंत बापूराव पाटील, वसंत पुरकर, भूपेंद्र जैन, गुणवंत सुरेश वाघ, पंकज कांतीलाल काटे, यशोदीप भास्करराव सोनवणे, दिनेश कापडणीस हे सपत्नीक पूजेचे मानकरी होते.

सदर पूजा-विधीचे मंदिराचे पुरोहित प्रसाद भंडारी, अतुल दीक्षित, शुभम वैष्णव, जयेंद्र वैद्य, अक्षय जोशी, मंदार कुलकर्णी, वैभव लोकाक्षी, अभिषेक भट यांनी पौरोहित्य केले. त्यांना उमेश पाठक व किशोर कुलकर्णी यांनी सहकार्य केले.

मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले, उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सहसचिव दिलीप बहिरम यांच्यासह मंदिरातील सेवेकरी व भाविक याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *