कळमसरे गावात गुरु – शिष्य जन्मोत्सवानिमित्त प्रबोधन कार्यक्रम !…  गुरू – शिष्यांचे आपल्यावर अनंत उपकार – पी डी पाटील [ जिल्हाध्यक्ष ]  छत्रपती शिवराय ते भिमराय यांना जोडणारा दुवा महात्मा जोतीराव फुले – लक्ष्मणराव पाटील [ शिवव्याख्याते ]
1 min read

कळमसरे गावात गुरु – शिष्य जन्मोत्सवानिमित्त प्रबोधन कार्यक्रम !… गुरू – शिष्यांचे आपल्यावर अनंत उपकार – पी डी पाटील [ जिल्हाध्यक्ष ] छत्रपती शिवराय ते भिमराय यांना जोडणारा दुवा महात्मा जोतीराव फुले – लक्ष्मणराव पाटील [ शिवव्याख्याते ]

Loading

कळमसरे गावात गुरु – शिष्य जन्मोत्सवानिमित्त प्रबोधन कार्यक्रम !…

गुरू – शिष्यांचे आपल्यावर अनंत उपकार – पी डी पाटील [ जिल्हाध्यक्ष ]

छत्रपती शिवराय ते भिमराय यांना जोडणारा दुवा महात्मा जोतीराव फुले – लक्ष्मणराव पाटील [ शिवव्याख्याते ]

अमळनेर प्रतिनिधी –
अमळनेर तालुक्यातील कळमसरे या गावात गुरु शिष्य जयंती निमित्त वैचारिक प्रबोधनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मोतीलाल महाजन यांनी केले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गावातील ज्येष्ठ नागरिक सुदाम महाजन होते. प्रमुख व्याख्याते म्हणून सत्यशोधक समाज संघाचे जिल्हाध्यक्ष तथा महात्मा फुले हायस्कूलचे उपशिक्षक पी डी पाटील, शिवव्याख्याते लक्ष्मणराव पाटील, सत्यशोधक विधीकर्ते शिवदास महाजन उपस्थित होते. विचार मंचावरील मान्यवरांच्या हस्ते सत्यशोधक महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रमुख अतिथींचे गुलाबपुष्प व ग्रंथ देऊन सत्कार करण्यात आला.
प्रमुख व्याख्याते पी डी पाटील यांनी राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनपट सांगून त्यांचे शैक्षणिक – सामाजिक कार्य विशद केले. त्या काळातील ब्राह्मण समाजातील अनिष्ट रूढी केशवपन, सतीची चाल, बालविवाह प्रथा बंद केल्या. व समस्त महिलांना गुलामगिरीतून मुक्त करून शिक्षणाचे दरवाजे उघडले. या गुरु शिष्यांचे आपल्यावर अनंत उपकार आहेत असे प्रतिपादन पाटील यांनी केले.
शिवव्याख्याते लक्ष्मणराव पाटील यांनी छत्रपती शिवराय, महात्मा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या काळात कोणत्याही शेतकऱ्यांनी आत्महत्या केली नाही. आज मात्र शेतीच्या मालाला भाव ठरविण्याचा अधिकार देखील शेतकऱ्याला नाही. कृषीप्रधान देशात शेतकऱ्याची अवस्था दयनीय आहे. यासाठी २७ जुलै रोजी धुळे येथे सत्यशोधक समाज संघ आयोजित शेतकरी परिषदेचे आयोजन केले आहे या ठिकाणी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन पाटील यांनी केले.
याप्रसंगी सरपंच जगदीश निकम, उपसरपंच जितेंद्र राजपूत , ज्येष्ठ सदस्य सुदाम नाना महाजन, नथ्थू चौधरी, संजय महाजन, भरत महाजन,विठ्ठल नामदास, नगराज चौधरी, झुलाल चौधरी, कैलास महाजन, अशोक चौधरी, फिरोज पठाण, हेमंत माळी, शांताराम माळी, चुनीनाल माळी, सुरेश माळी, दोधु माळी, नागराज माळी, संगीन माळी, मुरलीधर माळी, रतिलाल माळी, विजय माळी, नईम पठाण, सुभाष परदेशी, नितीन माळी, कडू माळी ,रोहिदास माळी, रघुनाथ माळी, गणेश माळी, गोकुळ माळी, पितांबर माळी,रवींद्र माळी समस्त गावकरी महिला – पुरुष, शाळेतील मुले -मुली मोठ्या संख्येने उपस्थित होते
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोतीलाल महाजन तर आभार सचिन निकम यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व कळमसरेवासियांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *