कनिष्ठ महाविद्यालयात मराठी विषय मराठी विषय अनिवार्य करावा.  *ठाणे जिल्हा कनिष्ठ मराठी शिक्षक महासंघातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना व आमदार डॉ.बालाजी किणीकर यांना निवेदन.
1 min read

कनिष्ठ महाविद्यालयात मराठी विषय मराठी विषय अनिवार्य करावा. *ठाणे जिल्हा कनिष्ठ मराठी शिक्षक महासंघातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना व आमदार डॉ.बालाजी किणीकर यांना निवेदन.

Loading

कनिष्ठ महाविद्यालयात मराठी विषय मराठी विषय अनिवार्य करावा.

*ठाणे जिल्हा कनिष्ठ मराठी शिक्षक महासंघातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना व आमदार डॉ.बालाजी किणीकर यांना निवेदन.
*
ठाणे: कल्याण::( मनिलाल शिंपी)कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघ ठाणे जिल्हा कार्यकारणी तर्फे आज दिनांक १ एप्रिल, २०२५ रोजी मराठी भाषा हा विषय सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अनिवार्य करण्यासाठी दि. १३ सप्टेंबर, २०२४ च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी व्हावी यासाठी माननीय जिल्हाधिकारी (ठाणे), उपजिल्हाधिकारी (ठाणे) व आमदार डॉ. बालाजी किणीकर यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघाच्या ठाणे जिल्हा प्रतिनिधी *प्रा. मंजिरी गजरे* यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्हा कार्यकारणी तर्फे निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हा कार्यकारिणीचे कार्याध्यक्ष *प्रा.अर्जुन उगलमुगले* (न्यू हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय, कल्याण) *उपाध्यक्षा प्रा. मनीषा राजपूत* (स. प्र. ज्ञानसाधना महाविद्यालय ठाणे ) सहसचिव प्रा. हरेश्वर भोये (स. प्र. ज्ञानसाधना महाविद्यालय, ठाणे ) महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रा. ज्योती लिपारे तसेच स. प्र. ज्ञानसाधना कनिष्ठ महाविद्यालयातील मराठी विषय शिक्षक प्रा. डॉ. वंदना शिंदे, प्रा. कांतीलाल चव्हाण व प्रा. ऋतुजा फाटक इत्यादी शिक्षक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *