आधार एक हात मदतीचा! जे का रंजले गांजले त्याशी म्हने जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जानावा  *दोंडाईचा येथे नववर्षानिमित्त शिंपी समाजातील निराधार महिलांना साड्या वाटप .*
1 min read

आधार एक हात मदतीचा! जे का रंजले गांजले त्याशी म्हने जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जानावा *दोंडाईचा येथे नववर्षानिमित्त शिंपी समाजातील निराधार महिलांना साड्या वाटप .*

Loading

आधार एक हात मदतीचा!
जे का रंजले गांजले त्याशी म्हने जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जानावा

*दोंडाईचा येथे नववर्षानिमित्त शिंपी समाजातील निराधार महिलांना साड्या वाटप .*

*मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचे कार्य संपूर्ण समाजासाठी अभिमानास्पद आहे.: पांडुरंग शिंपी*
दोंडाईचा (प्रतिनिधी)मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचे महाराष्ट्र राज्य प्रमुख,आर एस पी.कंमान्डर श्री मनीलाल रतिलाल शिंपी यांचा संकल्पनेनुसार, आधार एक हात मदतीचा, जे का रंजले गांजले त्याशी म्हने जो आपुले,तोची साधू ओळखावा देव तेथेची जानावा या प्रेरणेने दोंडाईचा येथील शिंपी समाज मंगलकार्यालयास धावती भेट दिली होती त्यावेळी त्यांनी निराधार भगिनी साठी साड्या दोंडाईचा शहर अध्यक्ष श्री पांडुरंग शिंंपी यांच्या कडे दिल्या होत्या त्या साडीचे वाटप आज गुढीपाडव्याच्या नववर्षाच्या शुभमुहूर्तावर आज मंगल कार्यालयाच्या जागेवर समाज संस्थेच्या समाजातील महिलांचा साडी देऊन सन्मान करण्यात आला* *सुमनबाई, सुशिलाबाई, बेबीबाई ,नबाबाई, लिलाबाई रेखा ताई, इत्यादी महिलांना श्री मनिलाल शिंपी यानी दिलेल्या साड्या दोंडाईचा शहर शिंपी समाज संस्थेच्या यांच्या सहकार्याने निराधार भगिनीना शहर शिंपी समाज महिला मंडळाच्या अध्यक्ष सौ. शितलताई कोंटुरवार शिल्पी समाज जिल्हा सचिव सौ. सुरेखाताई जाधव सौ ज्योत्स्नाताई सोनवणे सौ. आशाताई जगताप यांच्या शुभ हस्ते साड्या देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी यांनी महिलांनी सक्षम व सबल व्हावे असा संदेश देऊन कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन उपाध्यक्ष शरद पवार यांनी केले सचिव चंद्रकांत कापुरे यांनी आभार यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष पांडुरंग शिंपी उपाध्यक्ष शरद पवार, सचिव चंद्रकांत कापुरे, सहसचिव राजेन्द्र कोंटुरवार, मधुकर जाधव, सतिश जाधव यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमासाठी तुकाराम जगताप दिलीप सोनवणे व महिला भगिनी उपस्थित होते.मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुप,चंद्रानंद कृषी पणन संस्थेचे संचालक, व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव डॉ.यशवंत म्हात्रे,दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक डॉ किशोर बळीराम पाटील, स्वामीनारायण मंदिर हॉल चे संचालक डॉ. दिनेशभाई ठक्कर, डॉ.किशोर अढळकर यांचेही धन्यवाद मानले. व उपस्थित सर्व मान्यवरांचे आणि समाज बंधू भगिनींचे अध्यक्ष पांडुरंग शिंंपी यांनी आभार व्यक्त केले. अशी माहिती दोंडाईचा शिंपी समाज अध्यक्ष श्री पांडुरंग शिंपी यांच्याकडून देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *