क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्सवात साजरी करावी – भिमराव महाजन
1 min read

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्सवात साजरी करावी – भिमराव महाजन

Loading

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्सवात साजरी करावी – भिमराव महाजन

जळगांव/ प्रतिनिधी
महिला शिक्षणाचे आद्यजनक, शेतकऱ्यांचे कैवारी, दिन दलितांच्या व्यथा मांडून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी अहोरात्र परिश्रम करणारे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती शुक्रवार दि. ११ एप्रिल २०२५ रोजी समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा ओबीसी समाजाचे राष्ट्रीय नेते, राज्याचे माजी उपमुख्यमंत्री ना. छगनराव भुजबळ साहेब यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. जळगाव जिल्ह्यात देखील ठीकठिकाणी, गावा-गावात, घरा- घरात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करावी असे आवाहन अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष भिमराव महाजन यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *