शाळा मूल्यांकनाची जळगाव राज्यस्तरीय समिती गठित
1 min read

शाळा मूल्यांकनाची जळगाव राज्यस्तरीय समिती गठित

Loading

शाळा मूल्यांकनाची जळगाव राज्यस्तरीय समिती गठित

जळगाव – शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखड्याची जळगाव जिल्हास्तरीय मार्गदर्शन समिती प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी जाहीर केली आहे. या समितीत एकूण सात सदस्यांचा समावेश आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राज्यभरातील सर्व माध्यमांच्या व व्यवस्थापनाच्या शाळांचे मूल्यांकन करण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्यातर्फे शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्याबाबत जिल्हास्तरीय मार्गदर्शन समिती स्थापन करण्याच्या सूचना शिक्षण आयुक्तांनी दिल्या होत्या. त्यानुसार प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी जिल्हास्तरीय मार्गदर्शन समिती गठीत केली आहे. या समितीत डॉ. चंद्रकांत साळुंखे (वरिष्ठ अधिव्याख्याता डायट)श्री.एन.एफ.चौधरी (उपशिक्षणाधिकारी प्राथ.), श्री. फिरोज पठाण (उपशिक्षणाधिकारी माध्य.), डॉ.अतुल इंगळे (कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांतून एकमेव), डॉ.विशाल सोनकांबळे,श्री.श्यामकांत रूले, श्री.प्रशांत गवळी या सात सदस्यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे नुकत्याच गठित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय समितीत जळगाव जिल्ह्यातून एकमेव डॉ. जगदीश लक्ष्मण पाटील यांची निवड झाली आहे. ज्या शाळांना मूल्यांकन करताना अडचणी येत असतील त्यांनी मार्गदर्शन समिती सदस्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *