मुंदडा नगरमध्ये पाण्याची भीषण समस्या: ठेकेदारावर कारवाई नाहीतर हंडा मोर्चाची तयारी! **मुंदडा नगरातील पाणी पुरवठा ठेकेदाराच्या भोगळं कारभारामुळे गंभीर संकटात!**
![]()
मुंदडा नगरमध्ये पाण्याची घोर समस्या: ठेकेदारावर कारवाई नाहीतर हंडा मोर्चाची तयारी!
**मुंदडा नगरातील पाणी पुरवठा ठेकेदाराच्या भोगळं कारभारामुळे गंभीर संकटात!**
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
गेल्या एक ते दीड महिन्यांपासून 80 फुटी रींग रोडवर सुरू असलेल्या कामामुळे पाण्याचा पुरवठा 10 ते 12 दिवसांच्या अंतराने होत आहे. ठेकेदाराच्या मनमानी व्यवस्थापनामुळे मुंदडा नगर पाणी टाकीचा पाण्याचा पुरवठा गढूळ आणि अपर्णित झाला आहे, ज्यामुळे स्थानिक नागरिकांना ऊनात फिरावे लागत आहे.
नगरसेविका कमलबाई पितांबर पाटील आणि रवि पाटील यांनी, “जर नगरपरिषद ने संबंधित ठेकेदारावर योग्य ती कार्रवाई केली नाही, तर हंडा मोर्चा काढण्यास बदल काहीही नसेल,” असा इशारा दिला आहे. मुंदडा नगर पाण्याच्या टाकीपासून आर के नगर, भालेराव नगर, गुरुकुपा कॉलनी, सुरभी कॉलनी, विद्या विहार, शिव कॉलनी आणि अन्य 15 ते 20 कॉलन्यांना पाणी पुरवठा होत आहे. स्थानिक प्रशासनाने तातडीने कार्यवाही केली पाहिजे अन्यथा नागरिकांचा त्रास वाढत राहील!
गेल्या अनेक दिवसांपासून मुंदडा नगर विद्याविहार ,सुरभी व इतर कॉलनीतील सर्व बांधव भगिनी पाण्यासाठी वणवण फिरत आहे नगरपरिषद कर्मचारी, अधिकारी सुस्त आहेत पण जनता त्रस्त आहे ..घरपट्टी पानपट्टी नियमित भरून पाणीपुरवठा जर वेळेवर होत नसेल तर नगरपालिका प्रशासन फेल ठरले आहे अशी स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे


