इतिहास विभागाचा शैक्षणिक निरोप समारंभ संपन्न*
1 min read

इतिहास विभागाचा शैक्षणिक निरोप समारंभ संपन्न*

Loading

*इतिहास विभागाचा शैक्षणिक निरोप समारंभ संपन्न*
————————————————-
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप (स्वायत्त) महाविद्यालयतील इतिहास विभागाचा तृतीय वर्ष आणि एम ए. अंतिम वर्ष विद्यार्थ्यांंना निरोप समारंभ कार्यक्रम 17 मार्च रोजी नाट्य सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या समारोपाच्या कार्यक्रमात इतिहास विषयाचा तृतीय वर्ष व एम ए द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना समारोप दिला. प्रस्तुत कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ ए. बी.जैन होते तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे सहचिटणीस डॉ.धीरज वैष्णव, उपप्राचार्य डॉ.विजय तुंटे, उपप्राचार्या डॉ कल्पना पाटील, रुसा आणि आय.क्यु. ए.सी.समन्वयक डॉ.मुकेश भोळे, परीक्षा नियंत्रक प्रा.शशिकांत जोशी हे उपस्थित होते.कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत इतिहास विभाग प्रमुख प्रा.डॉ.धनंजय चौधरी यांनी इतिहास विभागाने वर्षभरातील केलेल्या कार्याचा आढावा घेऊन इतिहास शिकणारा विद्यार्थी इतिहास घडवतो असे प्रतिपादन केले.
सरस्वती देवीच्या प्रतिमेच्या पूजन व माल्यार्पण नंतर एम ए द्वितीय वर्षाची कु भाग्यश्री महाले या संशोधक विद्यार्थीने आपले मनोगत व्यक्त केले. तर नियमित हजेरी संशोधन व अध्ययन कार्य, उत्कृष्ठ व आदर्श, विनम्र विद्यार्थी म्हणून जावेद रफीक मन्यार या होतकरू विद्यार्थ्यांचा यावेळी गौरव करण्यात आला. त्यांनतर डॉ.धीरज वैष्णव, डॉ.विजय तुंटे, डॉ कल्पना पाटील यांनी शुभेच्छापर विद्यार्थ्यांना संदेश दिले.
प्रस्तुत कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ ए बी जैन यांनी NEP चे महत्व समजावित शिक्षण पूर्ण झाले असले तरी संशोधनातून रोजगार निर्माती करावे,असे मोलाचे मार्गदर्शन केले. दिवसभर चाललेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध मनोरंजन व कला कृतीचे सादरीकरण केले. भारतीय संस्कृती व परंपरांचे दर्शन समजावट, रांगोळी, पोषाख आणि नृत्य आणि गीत गायन हे सर्व सादरीकरणातून निदर्शनास आले.
यावेळी इतिहास विभागातील प्रा.भाग्यश्री जाधव, प्रा विजय साळुंखे, प्रा अवित पाटील, प्रा प्रसाद मुठे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभाराचे कार्य मयूर जाधव यांनी पार पाडले तर कार्यक्रमास महिमा पाटील, चेतना महाजन,अक्षय पाटील, राहुल पाटील, हरी चौधरी, सागर भोई आदी विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.बापू लोटण पाटील, विजय जाधव, साबीर शेख इत्यादी कार्यालयीन सहकारी यांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *