शिरसोले येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे भूमिपूजन संपन्न.* *शिरसोले गावाचा सर्वांगीन विकासासाठी सदैव तत्पर राहील, व त्वरित निधी उपलब्ध करून समस्या सोडविण्यासाठी उपाययोजना केल्या जातील: आमदार मंजुळा गावित.*
![]()
*शिरसोले येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे भूमिपूजन संपन्न.*
*शिरसोले गावाचा सर्वांगीन विकासासाठी सदैव तत्पर राहील, व त्वरित निधी उपलब्ध करून समस्या सोडविण्यासाठी उपाययोजना केल्या जातील: आमदार मंजुळा गावित.*
*धुळे :साक्री* (मनिलाल शिंपी)- शिरसोले गावात ग्रामस्थांच्या वतीने नुकतेच आमदार मंजुळा गावित, महंत योगी दिनानाथ महाराज, भाजपा धुळे जिल्हा उपाध्यक्ष चंद्रजित पाटील, शिवसेना साक्री विधानसभा क्षेत्र प्रमुख संभाजी अहिराव सतीश बच्छाव यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे भूमिपूजन संपन्न झाले. कार्यक्रमाप्रसंगी मंजुळा गावित म्हणाल्या आपल्या गावात विठ्ठल रुक्मिणी मंदिर होत आहे ही आनंदाची बाब आहे माझ्याकडून आपल्याला नेहमीच सहकार्य मिळेल आपल्या गावात जास्तीत जास्त लोकोपयोगी योजना राबवून गावची प्रगती केली जाईल. मला महिला भगिनींनी सांगितल्याप्रमाणे लाईट आणि पाण्याची समस्या तातडीने सोडवण्याचा प्रयत्न करेन येत्या दोन महिन्यात निधी उपलब्ध करून सभागृह, समाज मंदिराकरिता आर्थिक मदत करिन. असेही म्हणाल्या. महंत योगी दिनानाथ महाराज म्हणाले श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर निर्माण झाल्यावर आपल्या गावात आध्यात्मिक वातावरण तयार होईल त्यामुळे गावकऱ्यांमध्ये उत्साह निर्माण होऊन गावची प्रगती होईल. ग्रामस्थांनी देखील आपल्या यथा शक्तीप्रमाणे आर्थिक मदत करून मंदिराच्या बांधकामाला मदत करावी. गावकऱ्यांचे आभार मानून मंदिरातकरीता शुभेच्छा दिल्या. भाजपा जिल्हा उपाध्यक्ष चंद्रजीत पाटील म्हणाले मंदिराच्या निमित्ताने संपूर्ण गावात एकोपा राहील आणि संघटित होऊन गावांत चांगले बदल घडवून आणता येतील. मी सुद्धा माझ्याकडून मंदिरा करिता आर्थिक मदत करिन. आमदार मंजुळाताई गावित, भैय्यासो चंद्रजीत पाटील, महंत योगी दिनानाथ महाराज,शिवसेनेचे साक्री विधानसभा क्षेत्र प्रमुख संभाजी अहिरराव, अखिल भारतीय वारकरी संप्रदाय सदस्य सतीश बच्छाव, या प्रमुख मान्यवरांसह गावच्या सरपंच आशा बागुल, साक्री पंचायत समितीचे माजी सभापती कविता क्षीरसागर साक्री नगरपरिषदेचे नगरसेवक स्वप्नील भावसार आणि डॉ. गावित, सुवर्णा आजके शिल्पकार रामभाऊ, किरण दहिते, संभाजी अहिरराव, भोसले रावसाहेब तसेच शिरसोले ग्रामस्थ व युवा कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार गुलाबराव पाटील यांनी मानले.अशी माहिती शिरसोली गावचे सुपुत्र आदर्श मुख्याध्यापक गुलाबराव पाटील यांच्याकडून देण्यात आली आहे.

