महिला दिन २०२५: श्री भद्रा प्रतीक उद्योग समूहाचा अनोखा उपक्रम!
1 min read

महिला दिन २०२५: श्री भद्रा प्रतीक उद्योग समूहाचा अनोखा उपक्रम!

Loading

महिला दिन २०२५: श्री भद्रा प्रतीक उद्योग समूहाचा अनोखा उपक्रम!

अमळनेर प्रतिनिधी
आज, ८ मार्च २०२५, महिला दिनाच्या खास दिवशी, अमळनेरच्या श्री भद्रा प्रतीक उद्योग समूहाने एसटी महामंडळातील सर्व महिला कर्मचारी भगिनींना आवश्यक महिला कंडक्टरसाठी उपयुक्त पर्सचे वाटप केले. हे वितरण अमळनेर एसटी डेपो आगारात करण्यात आले, जिथे सर्व महिला कर्मचारी, डेपो मॅनेजर आणि इतर कर्मचारी उपस्थित होते.
श्री भद्रा प्रतीक उद्योग समूह नेहमीच सामाजिक आणि धार्मिक कार्यात अग्रगण्य राहतात, आणि त्यांच्या मौल्यवान उपक्रमांमुळे आज महिला दिवस आणखी विशेष बनला. संचालक बापूसाहेब संदीप छबुलाल साळी यांच्या हस्ते या पर्सचे वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमात उपस्थित सर्व महिला कर्मचार्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते, आणि डेपो मॅनेजर यांच्या उपस्थितीत श्री भद्रा प्रतीक उद्योग समूहाच्या या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांच्या या कार्यामुळे महिलांच्या सक्षमीकरणास एक नवा उमंग मिळाला आहे!
माजी नगरसेवक प्रताप आण्णा साळी व अर्बन बँक संचालक दीपक साळी व युवा उद्योजक मोन्टी साळी,विक्की साळी या सर्वांनी महिला दिनानिमित्ताने शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *