जागतिक महिला दिनानिमित्त “परिश्रम” निवास शाळेत भव्य सोहळा!  कर्तुत्ववान व्यक्तीचा झाला सन्मान
1 min read

जागतिक महिला दिनानिमित्त “परिश्रम” निवास शाळेत भव्य सोहळा! कर्तुत्ववान व्यक्तीचा झाला सन्मान

Loading

जागतिक महिला दिनानिमित्त “परिश्रम” निवास शाळेत भव्य सोहळा!

कर्तुत्ववान व्यक्तीचा झाला सन्मान

अमळनेर प्रतिनिधी
आज, ०८ मार्च २०२५ रोजी, आपला चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर धुळे संचलित परिश्रम दिव्यांग मुला-मुलींची निवासी शाळा, पारोळा जि. जळगांव येथे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.
या खास प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अमळनेरचे श्री. बापु जुलाल महाजन यांच्या सुपुत्री ताईसो. कु. भाग्यश्री बापु महाजन (महाराष्ट्र लोकसेवा गट क परीक्षा महसूल सहाय्यक मंत्रालय क्लार्क) उपस्थित होत्या. याव्यतिरीक्त मंचावर पारोळ्याचे श्री. मनोहर अभिमन महाजन यांच्या सुपुत्र चि. रोहित मनोहर महाजन, जो इंडियन नेव्ही अग्निवीर (SSR) मध्ये निवडला गेला, यांचीही उपस्थिती होती.
कार्यक्रमात शाळेतील विशेष शिक्षिका श्रीमती सविता पाटील मॅडम व श्रीमती वैशाली पाटील मॅडम यांनी राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, हेलन केलर, आणि झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या बलिदानावर प्रकाश टाकला. शाळेचे मुख्याध्यापक श्री. मनिष जाधव सरांनी महिला दिनाविषयी व शाळेच्या कार्याविषयी माहिती दिली.
अध्यक्षीय भाषणात कु. भाग्यश्री महाजन यांनी महिलांच्या अधिकारांविषयी विचार व्यक्त करताना स्वतःच्या जीवनातील खडतर प्रवासाच्या कथा सांगितल्या आणि संस्थेच्या अध्यक्ष व शाळेच्या कर्मचाऱ्यांच्या कामाचे कौतुक केले

 

 

 

 

 

 

 

 

 

कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष डॉ. योगेश महाजन यांनी विविध परीक्षांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा आमंत्रित करत त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी डॉ. महाजन यांनी महिलांच्या कष्टाची कदर करतांना सांगितले की, “जिद्द, चिकाटी आणि मेहनत यामुळेच तुम्ही या यशाच्या उंच शिखरावर पोहचला आहात.”
त्यांनी उपस्थित महिलांना त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा देऊन प्रेरित केले आणि त्यांच्या संघर्षाची कहाणी ऐकतांना दिलेल्या धाडसाबद्दल प्रशंसा केली.
या कार्यक्रमाने महिलांच्या सामर्थ्याला मान दिला असून, यशाच्या पथावर पुढे जाताना मुली आणि महिलांनी निसर्गातील अडचणींवर मात करण्याची प्रेरणा घेतली. महिलांचा सन्मान हा केवळ त्यांच्या यशाबद्दल नसून, त्यांच्या कष्ट आणि संघर्षालाही मान्यता देणारा आहे.
डॉ. महाजन यांच्या मार्गदर्शनामुळे उपस्थित महिलांनी एकजुटीने भविष्यातील आव्हानांचा सामना करण्याची प्रेरणा घेतली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. जगदीश सोनवणे सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. हेमंत महाजन सर यांनी केले. या कार्यक्रमाला सर्व कर्मचारी व मान्यवर उपस्थित होते.
महिला दिनाच्या या विशेष आयोजनात सर्वांनी एकत्र येऊन महिलांची शक्ती आणि सामर्थ्य यांचे कौतुक केले, ज्यामुळे समाजातील महिलांच्या अधिकारांचा व वाढीचा जागरूक करत एक सकारात्मक संदेश देण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *