चेतन महाजनचा संघर्ष: इंडियन नेव्हीमध्ये सिलेक्शनची प्रेरक कहाणी!  देवगांव देवळी हायस्कूलमध्ये झाला सत्कार..
1 min read

चेतन महाजनचा संघर्ष: इंडियन नेव्हीमध्ये सिलेक्शनची प्रेरक कहाणी! देवगांव देवळी हायस्कूलमध्ये झाला सत्कार..

Loading

 

चेतन महाजनचा संघर्ष: इंडियन नेव्हीमध्ये सिलेक्शनची प्रेरक कहाणी!

देवगांव देवळी हायस्कूलमध्ये झाला सत्कार..

अमळनेर प्रतिनिधी
महात्मा जोतीराव फुले हायस्कूल, देवगांव देवळी तालुक्यातील माजी विद्यार्थी चेतन आधार महाजन याने जिद्द, चिकाटी आणि नियमित अभ्यासाच्या जोरावर इंडियन नेव्हीत प्रवेश मिळवून आपल्या कर्तृत्वाची एक झलक दाखवली आहे. या अगोदर महात्मा फुले हायस्कूलचे अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये नोकरी करीत आहे. देवगाव देवळी मध्ये संघर्ष अभ्यासिका वर्गाचा चांगला फायदा विद्यार्थ्यांना होत आहे.
चेतनने इयत्ता दहावीमध्ये महात्मा फुले हायस्कूलमध्ये ८८% आणि इयत्ता बारावीमध्ये प्रताप महाविद्यालयात ८0% गुण मिळवले. बीएससी कॉम्प्युटरचे शालेय शिक्षण घेत असतांना, इंडियन नेव्हीची परीक्षा दिल्यानंतर त्याला सिलेक्ट करण्यात आले. नियमित तीन तासांच्या गहन अभ्यासामुळे त्याने हा महत्त्वाचा टप्पा गाठला आहे आणि तो आता आणखी उंच शिखर गाठण्यास सज्ज आहे.
घरची आर्थिक परिस्थिती बेताची , वडील भाजीपाल्याचा व्यवसाय करतात, आई गृहिणी आहे आणि त्याची बहीण दहावीत आहे. पण या सर्व आव्हानांवर मात करत, चेतनने आपल्या मेहनतीच्या जोरावर यशाला गवसणी घातली आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

महात्मा फुले हायस्कूलचे मुख्याध्यापक अनिल महाजन, शिक्षक आय.आर. महाजन, एस.के. महाजन, एच.ओ. माळी, अरविंद सोनटक्के आणि शिक्षकेत्तर कर्मचारी देवेश पाटील, संभाजी पाटील, गुरूदास पाटील यांच्या हस्ते त्याच्या यशाचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले.
चेतन महाजन यांमुळे सर्व विद्यार्थ्यांना एक प्रेरणा मिळत आहे की कष्ट, धैर्य आणि नियमित अध्ययनामुळे कोणतेही स्वप्न पूर्ण करता येते! त्याच्या यशाचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष विलासराव पाटील व संस्थेचे संचालक मंडळ यांनी पण केले आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *