उज्जैनकर फाउंडेशनची नाशिक जिल्हा सहविचार सभा संपन्न*
1 min read

उज्जैनकर फाउंडेशनची नाशिक जिल्हा सहविचार सभा संपन्न*

Loading

*उज्जैनकर फाउंडेशनची नाशिक जिल्हा सहविचार सभा संपन्न*

शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगर तालुका मुक्ताईनगर जिल्हा जळगावची सहविचार सभा नुकतीच संस्थापक अध्यक्ष डॉ.शिवचरण उज्जैनकर यांचे अध्यक्षतेखाली उत्तर महाराष्ट्र विभागीय सल्लागार तथा आळंदी येथील संमेलनाच्या अध्यक्षा प्रा. सौ. सुमतीताई पवार यांच्या निवासस्थानी गंगापूर रोड नाशिक येथे संपन्न झाली. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य तथा उज्जैनकर फाउंडेशनचे उत्तर महाराष्ट्र विभागीय संघटक डॉ. राजेश गायकवाड त्याचप्रमाणे उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष प्रा. डॉ. संदीप गोसावी उत्तर महाराष्ट्र विभागीय सल्लागार संपादक श्री कुमार कडलक त्याचप्रमाणे नाशिक जिल्हा अध्यक्ष प्रा. डॉ. प्रशांत रणसुरे सर या प्रसंगी उपस्थित होते. प्रसंगी आळंदी संमेलनाच्या अध्यक्षा प्रा.सौ.सुमतीताई पवार यांना डॉ.उज्जैनकर यांनी आभार पत्र देऊन त्यांचा गौरव केला. याप्रसंगी डॉ.राजेश गायकवाड हे सुद्धा आळंदी संमेलनाचे विशेष अतिथी होते त्यांना सुद्धा डॉ. शिवचरण उज्जैनकर यांनी आभार पत्र प्रदान करून सन्मानीत केले प्रसंगी संपादक श्री कुमार कडलक यांची उज्जैनकर फाउंडेशनच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय सल्लागार पदी निवड करण्यात आली तसे पत्र सुद्धा डॉ. उज्जैनकर यांनी त्यांना प्रदान केले. प्रसंगी डॉ. उज्जैनकर यांनी सर्वांनाच आदिशक्ती संत मुक्ताईचा फोटो व हरीपाठाची पुस्तिका व आळंदी संमेलनाचा विशेषांक सप्रेम भेट देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी प्रा. सुमतीताई पवार यांनी त्यांचे स्वलिखित पुस्तक उपस्थिताना त्यांना भेट म्हणून दिलीत तसेच याप्रसंगी सकाळ वृत्तपत्राचे वृत्त संपादक साहित्य अकादमी प्राप्त श्री संजय वाघ यांची सुद्धा त्यांच्या कार्यालयात डॉ .उज्जैनकर व डॉ. संदीप गोसावी यांनी भेट घेतली असता त्यांचा आदिशक्ती मुक्ताई चा फोटो व आळंदी संमेलनाचा विशेषांक व हरीपाठाची पुस्तिका सप्रेम भेट देऊन सत्कार करण्यात आला याप्रसंगी कल्याण व त्र्यंबकेश्वर येथील पुढील संमेलनाविषयी चर्चा करण्यात आली.याप्रसंगी डॉ. शिवचरण उज्जैनकर यांच्या कार्याचे सर्वांनीच कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *