जागतिक महिला दिनी होणार धडपडणाऱ्या महिलांचा सन्मान  भव्य कीर्तन सोहळ्याचेही आयोजन : स्वप्ना पाटील व विक्रांत पाटील यांचा स्तुत्य उपक्रम…!
1 min read

जागतिक महिला दिनी होणार धडपडणाऱ्या महिलांचा सन्मान भव्य कीर्तन सोहळ्याचेही आयोजन : स्वप्ना पाटील व विक्रांत पाटील यांचा स्तुत्य उपक्रम…!

Loading

जागतिक महिला दिनी होणार धडपडणाऱ्या महिलांचा सन्मान

भव्य कीर्तन सोहळ्याचेही आयोजन : स्वप्ना पाटील व विक्रांत पाटील यांचा स्तुत्य उपक्रम…!

अमळनेर : सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असलेल्या सामाजिक कार्यकर्त्या तथा ‘प्रभाग क्र. १७ अ’च्या भावी नगरसेविका स्वप्ना विक्रांत पाटील आणि माजी नगरसेवक विक्रांत पाटील यांनी जागतिक महिला दिनी अर्थात ८ मार्च रोजी संसारात धडपडणाऱ्या महिलांना सन्मान व भव्य कीर्तन सोहळ्याचे आयोजन केले आहे.
शनिवारी, ८ रोजी, रात्री ८ ते ११ वाजेदरम्यान श्री. संत सखाराम महाराज यांच्या शेतातील शारदा कॉलनी व सावता वाडी मधील मोकळे मैदान, श्रीकृष्ण नगर,वड चौक, अमळनेर येथे संसारात धडपडणाऱ्या महिलांचा सन्मान तसेच समाज प्रबोधन व जनजागृतीसाठी सुप्रसिद्ध अहिराणी कीर्तनकार ह.भ.प.श्री रविकिरण महाराज (दोंडाईचाकर) यांच्या जाहीर किर्तनाचे आयोजन करण्यात आले असूून या कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजातील महिलांना प्रेरित केले जाणार आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

कार्यक्रमाला हभप श्री अरुणबापू पाटील, माऊली भजनी मंडळ पैलाड, मृदुंगाचार्य हभप श्री निवृत्ती महाराज कानळदेकर, गायनाचार्य हभप श्री गजानन महाराज भोलाणेकर, हार्माेनियम वादक हभप श्री चतुर महाराज लोंढवेकर आणि सुंदरपट्टीचे माजी सरपंच सुरेश अर्जून पाटील यांचे विशेष सहकार्य लाभणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *