राज्यातील शाळांना टप्पा अनुदान निधी त्वरित मिळावा यासाठी शिक्षक आमदार यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे.* *पावसाळी अधिवेशनात निधीची घोषणा करून हिवाळी अधिवेशनात निधी देण्यात दिरंगाई शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी.*
![]()
*राज्यातील शाळांना टप्पा अनुदान निधी त्वरित मिळावा यासाठी शिक्षक आमदार यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे.*
*पावसाळी अधिवेशनात निधीची घोषणा करून हिवाळी अधिवेशनात निधी देण्यात दिरंगाई शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी.*
ठाणे: कल्याण: ( मनिलाल शिंपी) पावसाळी अधिवेशनात घोषित केल्याप्रमाणे 1जून 2024 पासून शाळांना 20 टक्के अनुदान मंजूर करण्यात यावे याविषयी चर्चा केली होती.यावेळी अघोषित शाळांना 20% अनुदान, त्रुटी पूर्तता केलेल्या शाळांना पुढील टप्पा अनुदान आणि औषध अनुदानित शाळांना पुढील टप्पा अनुदानाची घोषणा केली असून हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांमध्ये निधी मंजूर करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यानुसार14 ऑक्टोबर 2024 रोजी अनुदान देणे विषयीचे शासन आदेश पारित करण्यात आला आहे. तरीही हिवाळी अधिवेशनात येथे मंजूर केला नाही. व सुरू असलेल्या अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मंजूर झालेल्या पुरवणी मागण्यांमध्ये निधीची कुठेही तरतूद झालेली नाही त्यामुळे राज्यभरातील शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे व शासनाकडून आमची फसवणूक झाली आहे अशी चर्चा होत आहे. फोनवरून शिक्षक आमदारांनाही उलट सुलट बोलणे ऐकावे लागत आहे. यानुसार शिक्षक आमदार यांच्याकडून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना निवेदनाद्वारे कळकळीची विनंती करण्यात आली आहे. त्यासाठी अनुदानाच्या टप्पा वाढ होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची कोकण विभाग शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी सभागृहात भेट घेतली यावेळी आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार ज. मो. अभ्यंकर , आमदार निरंजन डावखरे, आमदार विक्रम काळे,आमदार जयंत आजगावकर, आमदार मनीषा कायंदे आमदार उमा खापरे चर्चा करताना सोबत होते.
शालेय शिक्षण टप्पा अनुदानासाठी निवेदन देताना आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्यासोबत आमदार जयंत आजगावकर, आमदार विक्रम काळे उपस्थित होते.
या अर्थसंकल्पात टप्पा अनुदानाचा विषय घ्यावा अशी मागणी केली, अर्थमंत्र्यांशी बोलून विषय घ्यायला लावतो असे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

