छोटू मावची यांना पीएचडी पदवी प्रदान*
1 min read

छोटू मावची यांना पीएचडी पदवी प्रदान*

Loading

*छोटू मावची यांना पीएचडी पदवी प्रदान*

अमळनेर: खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागात काही काळ तासिका तत्वावर सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले आणि राज्यशास्त्र संशोधन केंद्राचे विद्यार्थी छोटू नकुल मावची यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ,जळगाव यांनी दिनांक 04 मार्च 2025 रोजी पीएचडी नोटिफिकेशन देऊन सन्मानित केले.
छोटू मावची हे शारीरिक दृष्टिकोनातून अपंग असले तरी त्यांनी *पद्मश्री भवरलाल जैन यांच्या कार्यावरील गांधीवादाच्या प्रभावाचे चिकित्सक अध्ययन* या विषयावर संशोधन कार्य राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ.विजय तुंटे यांच्या मार्गदर्शनाखाली परिश्रमपूर्वक पूर्ण केले.
त्यांचा पीएचडीचा वायवा 27 फेब्रुवारी 2025 रोजी ऑनलाइन पद्धतीने गुगल मीट वर संपन्न झाले. यावेळी बहिस्थ परीक्षक म्हणून डॉ.दत्तात्रय वाबळे (पुणे) हे होते तर चेअरमन म्हणून डॉ.जयेश पाडवी (जळगाव) यांनी कार्य पार पाडले.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत छोटू मावची यांनी संशोधन कार्य पूर्ण केले.आपल्या संशोधन कार्य दरम्यान त्यांनी अनेक संशोधन संस्था व ग्रंथालयाला भेटी दिले आणि अनेकांच्या मुलाखती घेऊन आपले संशोधन पूर्ण केले.
त्यांच्या शैक्षणिक यशा बद्दल कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठचे प्र-कुलगुरु प्रा.डॉ.एस.टी.इंगळे,कुलसचिव मा.विनोद पाटील,सहायक कुलसचिव जी एन पवार, अनिल पाटील,यशवंत शिसोदे,वाणिज्य व व्यवस्थापन शाखेचे अधिष्ठाता डॉ.अनिल डोंगरे,डॉ.महेंद्र महाजन, त्याचबरोबर इनक्यूबीशन सेंटरचे प्रमुख डॉ.जवळगेकर,अमित गावित,डॉ.जयेश पाडवी,डॉ.विलास गावित,सुनील खर्डे,भालेराव हे यावेळी उपस्थित राहून संशोधकाचे अभिनंदन केले.
त्यांच्या या यशाबद्दल प्राचार्य एल पी देशमुख, सेवा निवृत्त प्रा.के.के वळवी, डॉ.राजीव पवार,प्रा.देवेंद्र इंगळे,डॉ.अशोक वसावे,डॉ अशोक पाडवी,प्रताप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अरुण जैन, कुलसचिव राकेश निळे,भटू चौधरी,प्रा.जे बी जैन,प्रा जे सी अग्रवाल,डॉ पी बी भराटे,प्रा एम एन सूर्यवंशी,प्रा.सुनंदा वैद्य,डॉ.धीरज वैष्णव,डॉ.अमित पाटील,डॉ.धनंजय चौधरी,डॉ.व्ही.बी मांटे, डॉ.कल्पना पाटील,डॉ.आर सी सरवदे,डॉ हर्षवर्धन जाधव,डॉ शशिकांत सोनवणे,ग्रंथपाल दिपक पाटील,डॉ मुकेश भोळे, प्रा एस ए जोशी,डॉ.नलिनी पाटील,प्रा.वृषाली वाकडे,प्रा.वैशाली राठोड,डॉ.जितेंद्र पाटील,प्रा.विजय साळुंखे,डॉ.प्रमोद चौधरी,डॉ.रवी बाळसकर, डॉ.विवेक बडगुजर, डॉ.कैलास निळे,डॉ.महेंद्र महाजन,डॉ.माधव भुसनर, डॉ.किरण गावित,प्रा.जयेश साळवे,प्रा अर्जुन पावरा,प्रा.हिमांशू गोसावी,प्रा अमोल अहिरे,सीसीएमसी विभागाचे दिलीप शिरसाठ,पराग पाटील आदीनी अभिनंदन व कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *