अमळनेरमध्ये गांधीगिरी आंदोलन: नगरपरिषद वसुलीविरोधात मा.आमदार शिरीषदादा चौधरी मित्रपरिवार आघाडीचे तीव्र विरोध
1 min read

अमळनेरमध्ये गांधीगिरी आंदोलन: नगरपरिषद वसुलीविरोधात मा.आमदार शिरीषदादा चौधरी मित्रपरिवार आघाडीचे तीव्र विरोध

Loading

अमळनेरमध्ये गांधीगिरी आंदोलन: नगरपरिषद वसुलीविरोधात मा.आमदार शिरीषदादा चौधरी मित्रपरिवार आघाडीचे तीव्र विरोध

अमळनेर प्रतिनिधी-
नगरपरिषद नागरिकांकडून पाणीपट्टीवर दोन टक्के व्याज जे तूगलघी पद्धतीने वसूल करत आहे.तसेच लोकवर्गणी चा माध्यमातून नगरपरिषद लूट करीत आहे.या विरोधात मागील वर्षी देखील आमदार शिरीषदादा चौधरी मित्र परिवार आघाडीने आंदोलन केली होती. त्यावेळेस 2%व्याज वसुली तूर्त स्थगित केले होते. परंतु पुन्हा नगरपरिषदेने दोन टक्के व्याज वसुली सुरू केल्याने नागरिकांची मोठी लूट नगरपरिषद करीत असल्याचा आरोप मित्रपरिवार आघाडीने केला आहे जिल्ह्यातील कुठल्याही नगरपालिकेला अशी वसुली नसताना फक्त अमळनेर नगर परिषदेत वसुली केली जात आहे.

 

 

त्याचप्रमाणे अनेक वर्षापासून लोकवर्गणीच्या नावाने छुपाकर लावून नागरिकांची लूट सुरू आहे त्या विरोधात आज दि. 03/03/2025 रोजी आमदार श्री दादा चौधरी मित्रपरिवार आघाडीच्या वतीने गांधीगिरी करत जनावरांना कापण्याच्या प्रतिकात्मक सुरा भेट देत,निवेदन देऊन तात्काळ लोकवर्गणी व दोन टक्के व्याज वसुली बंद करावी अन्यथा मित्र परिवार आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला आहे मा. मुख्याधिकारी नेरकर साहेब यांनी लवकरात लवकर याबाबत सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे आश्वासन दिले आहे. गटनेते प्रवीण कुमार पाठक, प्रतोद सलीम भाई टोपी,माजी नगरसेवक गुलाब बापू पाटील, भाऊसाहेब महाजन, धनंजय महाजन, अनिल महाजन,संतोष लोहेरे ,दीपक चौगुले, पंकज चौधरी,शुभम यादव, राहुल कंजर, कुणाल साळी, नवीद शेख नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते गांधीगिरी आंदोलनामुळे प्रशासनाची थोडीशी तारांबळ उडाली होती आगळ्या वेगळ्या पद्धतीने केलेल्या आंदोलनाची सर्वत्र चर्चा सुरू होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *