स्वयंसिद्धा राष्ट्रीय पुरस्कार शिवमती पुनम ठाकरे यांना जाहीर
1 min read

स्वयंसिद्धा राष्ट्रीय पुरस्कार शिवमती पुनम ठाकरे यांना जाहीर

Loading

स्वयंसिद्धा राष्ट्रीय पुरस्कार शिवमती पुनम ठाकरे यांना जाहीर

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त स्वयंसिद्धा राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. महेंद्र देशपांडे यांनी केली असून यात अमळनेर येथील शिवमती पुनम बापुराव ठाकरे यांच्या पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रातील कार्याची दखल घेवून त्यांना स्वयंसिध्दा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

 

 

 

 

हा राष्ट्रीय पुरस्कार वितरण समारंभ रविवार, दि. ९ मार्च २०२५ रोजी दुपारी २.३० वा. होरायझन अकॅडमी सभागृह,
गंगापूर रोड, नाशिक येथे संपन्न होणार आहे. हा कार्यक्रम अतिविशिष्ट मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा या प्रतिष्ठेच्या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. यामध्ये शिवमती पुनम बापुराव ठाकरे यांचा समावेश असून त्यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल विविध स्तरावरून अभिनंदन करण्यात येत आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन पत्रकार संघातर्फे करण्यात आले आहे.
उपक्रमशील शिक्षक तथा पत्रकार बापूराव ठाकरे यांच्या सौ पुनम ठाकरे या पत्नी आहेत. सानेगुरुजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष हेमकांत पाटील, सचीव संदीप घोरपडे व संचालक मंडळ, मुख्याध्यापक, शिक्षक,
व्हाईस ऑफ मीडियाचे राज्य सरचिटणीस डॉ डिगंबर महाले, व्हाईस ऑफ मीडिया साप्ताहिक विंगचे जिल्हाध्यक्ष संजय सूर्यवंशी, व्हाईस आँफ मिडीयाचे जिल्हा उपाध्यक्ष जयेश कुमार काटे, तालुका अध्यक्ष उमेश काटे, शहराध्यक्ष जयवंतराव वानखेडे व पदाधिकारी व सदस्य,डिजिटल मीडियाचे तालुका अध्यक्ष ईश्वर महाजन यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *