जायन्ट्स ग्रुप अमळनेर” तर्फे इयता दहावी च्या शालेय विद्यार्थ्यांसाठी एक दिवसीय कार्यशाळा संपन्न
![]()
*”जायन्ट्स ग्रुप अमळनेर” तर्फे इयता दहावी च्या शालेय विद्यार्थ्यांसाठी एक दिवसीय कार्यशाळा संपन्न
अमळनेर प्रतिनिधी
विविध शैक्षणिक उपक्रम “जायन्ट्स ग्रुप ऑफ अमळनेर तर्फे राबविण्यात येत असतात ,या विषयाअंतर्गत
सायबर सिक्युरिटी, AI तंत्रज्ञान विषयी माहिती जायन्ट्स उपाध्यक्ष प्रो, राजेंद्र भावसार सर यांनी तर “परीक्षेला जाता जाता” या विषयी प्रा,श्री दीपक महाजन सर यांचे इंग्रजी या विषयावर प्रश्नांची उत्तरे सोडवताना घ्यावयाची काळजी,या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.
जायन्ट्स ग्रुप अमळनेर विविध समाज उपयोगी उपक्रम राबवत,आहे यावर्षी शालेय विद्यार्थ्यांना त्याच्या बौद्धिक कला गुणांना वाव मिळावा व त्याच प्रमाणे त्याना अभ्यासक्रमसोबत च इतर सामाजिक गोष्टींमध्ये उत्सुकता निर्माण व्हावी या दृष्टीने विद्यार्थ्यांना निसर्गाच्या सानिध्यात नेऊन पक्षींनिरीक्षण ,तसेच पक्षाविषयीची slide शो जायन्ट्स सदस्य व पक्षीमित्र अश्विन पाटील हे प्रोजेक्टर च उपलब्धता झाली की लवकरच देणार आहेत .त्याचाच इक भाग म्हणून योग प्राशिक्षण , तसेच विविध विषयांवर विद्यार्थीसाठी काम जायन्ट्स ग्रुपच्या माध्यमातून सध्या होत असताना दिसून येत आहे.विशेष म्हणजे या ग्रुप ला कुठलाही निधी वरून उपलब्ध होत नाही तरीसुद्धा हा ग्रुप शैक्षणिक, सामाजिक, आरोग्य विषयक उपक्रम हे राबवित आहेत.म्हणून जायन्ट्स ग्रुप अगदी कमी वेळात नावारूपाला येत आहेत.
आजच्या युगात तंत्रज्ञानाने सर्व क्षेत्रात आपली पाळेमुळे घट्ट रोवली आहेत.अलीकडे सायबर तंत्रज्ञानाचा गैरवापर करून समाजात अनेक गुन्हेगारी घटना घडत असतानाचे लक्षात येत आहे व यासाठी अनेक सुशिक्षित माणसे देखील बळी पडतांना आपल्याला दिसून येत आहेत . त्यातील काही घटना या अज्ञानातून घडून येत आहेत. त्यासाठी नुकतेच येऊ घातलेले (AI तंत्रज्ञान ) कृत्रिम बुद्धिमत्ता याचे फायदे व तोटे तसेच सायबर सिक्युअर होणे आज काळाची गरज बनलेली आहे. यासाठी जायन्ट्स ग्रुपच्या माध्यमातून ग्रुप चे उपाध्यक्ष ,संचालक राजेंद्र पी भावसार सर यांनी एक दिवसीय कार्यशाळा विद्यार्थ्यांसाठी राबविली.यात विद्यार्थ्यांच्या असंख्य प्रश्नांची उत्तरे त्यांनी उलगडून दाखवली . या उपक्रमाचे सर्व पालकांकडून कौतुक करण्यात आले.
तसेच प्रा दिपक महाजन सर यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेला जाता जाता कोणकोणत्या गोष्टींची आपण काळजी घेतली पाहिजे व गुणवत्ता वाढीसाठी वेळेचे नियोजन कसे करावे यासंबंधी मार्गदर्शन केले.
हा कार्यक्रम अंबर्शी मंदिर हॉल येथे पार पडला यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्षपद गुरुवर्य व अकाऊंट विषयातील भीष्म पितामह ,ज्यांनी की अनेक C.A ना त्याच्या विषयातील पाया मजबूत करणारे व जायन्ट्स मार्गदर्शक नानासो चंदुलाल बडगुजर सर या विशेष अतिथीनि भूषविले.या कार्यक्रम वेळी
उपस्थित जायन्ट्स ग्रुपचे अध्यक्ष डॉ.सुनील पाटील, जेष्ठ मार्गदक प्रा. देशपांडे सर, प्रा. प्रवीण भावसार सर,जायन्ट्स रमेश महाजन , जायन्ट्स महेश पाटील प्रा दिपक महाजन सर, जे के चौधरी सर, मनोहर महाजन सर, प्राचार्य प्रकाश महाजन हे लोकमान्य शाळेतील विद्यार्थीसह उपस्थित होते
कार्यशाळेची सुरुवात कु दिव्या चौधरी, नेहा पाटील,मोनाली महाजन या शालेय विद्यार्थिनींनी अतिशय सुंदर, कोमल लयबद्ध अशा सुरात स्वागतगीत म्हणून केली त्याना जायन्ट्स ग्रुप तर्फे बक्षिसे देण्यात आली त्यातच सुंदर असे सूत्रसंचालन कु तन्वी पाटील व कु प्राची पाटील या शालेय विद्यर्थिनींनी अगदी मुरलेल्या सूत्रसंचालका सारखे केले त्यानाही जायन्ट्स तर्फे बक्षीस देण्यात आलीत ,, कारण विद्यार्थांच्या विविध कलागुणांना वाव देण्याचे जायन्ट्स तर्फे ठरवण्यात आले आहे .
या कार्यक्रमाच्यशस्वीतेसाठी प्रोजेक्ट चेअरमन व जायन्ट्स सेक्रेटरी संदीप महाजन व त्यांच्या पत्नी सौ युक्ता महाजन यांनी परिश्रम घेतले.
पालकांतर्फे कैलास महाजन यांनी जायन्ट्स ग्रुप च्या या उपक्रमाचे आभार मानलेत,.



