ज्ञानदा सायन्स क्लासेस विज्ञान प्रदर्शनासह विज्ञान दिन उत्साहात साजरा*
1 min read

ज्ञानदा सायन्स क्लासेस विज्ञान प्रदर्शनासह विज्ञान दिन उत्साहात साजरा*

Loading

*ज्ञानदा सायन्स क्लासेस विज्ञान प्रदर्शनासह विज्ञान दिन उत्साहात साजरा*

 

अमळनेर विज्ञान दिनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील ज्ञानदा सायन्स क्लासेस मध्ये इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंतचे विज्ञान प्रकल्प आयोजित करण्यात आले होते जवळपास ६५ पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी या विज्ञान प्रदर्शनात सहभाग नोंदविला सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या बाल वैज्ञानिक गुणांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अमळनेर विज्ञान मंडळाचे अध्यक्ष व वावडे हायस्कूलचे विज्ञान शिक्षक श्री निरंजन पेंढारे सर व कार्यक्रमाचे अध्यक्ष अमळनेर विज्ञान मंडळाचे सचिव व शहापूर हायस्कूलचे विज्ञान शिक्षक श्री आर एस पाटील सर होते. दोघांनी उत्कृष्ट परीक्षण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. रागिणी पाटील तसेच आभार प्रदर्शन कु. स्वरा पाटील यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी क्लासेसचे संचालक धिरज पवार सर व सौ. स्वाती पवार यांनी परिश्रम घेतले विज्ञान प्रदर्शन स्पर्धेचा निकाल
मोठा गट प्रथम क्रमांक -चि. सत्यम वानखेडे (इयत्ता नववी), द्वितीय क्रमांक -चि. देवेंद्र पाटील (इयत्ता नववी), तृतीय क्रमांक- कु. दिशा अहिरराव (इयत्ता आठवी) तसेच उत्तेजनार्थ चि. मोहित पाटील (इयत्ता आठवी ) व चि. साई दुसाने (इयत्ता आठवी) आणि लहान गट प्रथम क्रमांक- चि. जयेश पाटील (इयत्ता सातवी), द्वितीय क्रमांक- चि. गौरव चौधरी (इयत्ता सातवी) ,तृतीय क्रमांक-प्रणव शंकरपाळ (इयत्ता सातवी) तसेच उत्तेजनार्थ कु. नव्या पाटील (इयत्ता सातवी) व कु. लावण्या पाटील (इयत्ता सहावी) यांनी बक्षीसे पटकावली इतर सर्व विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आली या कार्यक्रमाला श्री.ईश्वर महाजन सर, प्रा. हिरालाल पाटील सर, श्री प्रदीप चौधरी सर, श्री दीपक बेलदार सर, श्री .राजेंद्र पाटील सर , अँड श्री.जाधव सर व मॅडम, सौ स्वाती पाटील, श्री.राजेंद्र देशमुख सर ,पालक वर्ग आणि तालुक्यातील शाळेतील विद्यार्थ्यांनी भेट दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *