स्व. श्रीधरराव उपाख्य ‘मालक’ यांची १०२ वी जयंती उत्सवाचा समारोप व बक्षीस वितरण समारंभ संपन्न
1 min read

स्व. श्रीधरराव उपाख्य ‘मालक’ यांची १०२ वी जयंती उत्सवाचा समारोप व बक्षीस वितरण समारंभ संपन्न

Loading

स्व. श्रीधरराव उपाख्य ‘मालक’ यांची १०२ वी जयंती उत्सवाचा समारोप व बक्षीस वितरण समारंभ संपन्न
——————
निंबा: स्व. श्रीधरराव उपाख्य ‘मालक’ यांच्या १०२ व्या जयंती उत्सवाचा समारोप व बक्षीस वितरण समारंभ दि. २५ फेब्रुवारी २०२५ रोजी उत्साहात संपन्न झाला. या समारोप सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून सं.गा.बा.अ. विद्यापीठाचे कार्यकारिणी सदस्य प्राचार्य भैय्यासाहेब मेटकर यांची तथा अध्यक्षस्थानी श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती चे उपाध्यक्ष ॲड. गजाननराव पुंडकर यांची उपस्थिति होती. या प्रसंगी कार्यक्रमास आवर्जून उपस्थित आंमत्रितांमध्ये संस्थेचे उपाध्यक्ष
ॲड. भैय्यासाहेब पाटील (पुसदेकर), कार्यकारिणी सदस्य हेमंतभाऊ काळमेघ, प्राचार्य केशवराव गावंडे, सुरेशदादा खोटरे, प्रा. सुभाषराव बनसोड तसेच स्वीकृत सदस्य प्राचार्य डॉ. अंबादासजी कुलट, प्राचार्य अमोलजी महल्ले, पंजाबराव देशमुख बँकेचे अध्यक्ष प्रा. नरेश पाटील व संस्थेचे माजी अध्यक्ष महादेवरावजी भुईभार, प्रतिभा साहित्य संघाचे अध्यक्ष विठ्ठल कुलट तसेच श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे आजीवन सभासद रामेश्वराव वाकळे, बाळगंगाधर वैराळे, रमेशराव सातारकर, सुरेशराव आढे, भास्कराव पाटील, पुरूषोत्तमजी दहे, दादारावजी पाथ्रीकर यांचेसह अकोला व निंबा पंचक्रोशीतील प्रतिष्ठित नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
कार्यक्रमाचा प्रारंभ स्वागत गीत व स्व. श्रीधरराव ‘मालक’ यांच्या स्मृती गीताने विद्यालयाचे माजी शिक्षक उमेश पिल्ले व संच यांचे सादरीकरणाने झाला. निंबा व परिसरातील विद्यार्थ्यांचा उस्फूर्त प्रतिसाद लाभलेल्या रंगभरण स्पर्धेतील विजेत्यांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे व प्रमाणपत्र वितरीत करण्यात आलीत.
वऱ्हाडी कवी श्री. विठ्ठल कुलट यांनी स्व. श्रीधरराव ‘मालक’ यांच्या कार्यावर आधारित कवितांद्वारे उपस्थितांचे मने जिंकीत आपल्या दर्जेदार प्रबोधनाने मनोरंजनही केले. कार्यकारिणी सदस्य हेमंतभाऊ काळमेघ यांनी आपल्या भाषणात स्व. श्रीधरराव यांच्या कार्याचा आढावा घेऊन त्यांच्या आदर्श विचारांवर चालण्याचे सर्वांना मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुणे श्री. भैय्यासाहेब मेटकर यांनी आपल्या भाषणात मालकांचे उच्च शिक्षण संस्थेचे स्वप्न साकार झाल्याचे समाधान व्यक्त करून त्यांच्या बहुआयामी कार्यामुळे ही स्मृती निरंतर अजरामर राहील असे प्रतिपादित केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात ॲड. गजाननराव पुंडकर यांनी स्व. श्रीधरराव ‘मालक’ यांचे कार्य संत गाडगेबाबांच्या व डॉ भाऊसाहेबांच्या सखोल आदर्शावर आधारलेले असल्याने समाजातील गोरगरीबांसाठी त्यांनी केलेली सर्वांगीणसेवा योगदान समाजाला अभिमानास्पद असल्याचे भावानिक विधान करून विद्यार्थांनी हा वारसा जोपासन्याचे आवाहनही केले. निंबा परिसराच्या मूलभूत विकासासाठी त्यांनी घेतलेल्यपुढाकारामुळेच त्यांना “मालक” ही पदवी मिळाल्याचे व त्यांचे जीवन तथा कार्य नव्या पिढीसमोर आदर्श म्हणून आणणे गरजेचे असल्याचे ॲड पुंडकर यांनी विषद केले. समारोप सोहळ्यास श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती चे आजीवन सभासद
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बाळसारफ मॅडम, प्रास्ताविक प्राचार्या डॉ सौ एन पी . भामोदे तथा आभार प्रदर्शन पर्यवेक्षक भास्कर खंडारे यांनी केले. या कार्यक्रम आयोजन, स्पर्धा उपक्रम व समारोपीय सोहळ्याचा यशस्वितेसाठी निंबा येथील नागरीक व शाळेतील प्राध्यापक, शिक्षक, कर्मचारीवर्ग तथा स्व. श्रीधरराव देशमुख उपाख्य मालक प्रतिष्ठान निंबा कार्यकारिणी यांनी अथक परिश्रम घेतले. सहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *