डॉ.आर.सी.सरवदे राष्ट्रीय विद्याभूषण पुरस्काराने सन्मानित*
![]()
*डॉ.आर.सी.सरवदे राष्ट्रीय विद्याभूषण पुरस्काराने सन्मानित*
———————————————-
अमळनेर : येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय अमळनेर अंतर्गत प्राणीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ.आर सी सरवदे हे राष्ट्रीय विद्याभूषण पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले.शिक्षण व राष्ट्राच्या प्रगतीत उल्लेखनीय सहभागाबद्दल त्यांना एका राष्ट्रीय परिषदेत विद्याभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार ‘देश की बात फाउंडेशन’, नवी दिल्ली यांच्याद्वारे 22 फेब्रुवारी 2025 रोजी महिला महाविद्यालय शहादा या ठिकाणी माननीय गोपाल पाटील संदीप पाटील, ईश्वर पाटील या मान्यवरांच्या उपस्थित प्रदान करण्यात आला.
डॉ. सरवदे यांना यापूर्वी सुद्धा अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले,त्यांच्या या सातत्यपूर्ण शैक्षणिक यशाबद्दल खानदेश शिक्षण मंडळाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अरुण जैन,संस्थेचे सहचिटणीस डॉ.धीरज वैष्णव,उपप्राचार्य डॉ. विजय तुंटे,डॉ.अमित पाटील,डॉ.कल्पना पाटील, डॉ.व्ही बी मांटे, डॉ.वाय व्ही तोरवणे,डॉ.पराग पाटील, डॉ. मुकेश भोळे,डॉ.शशिकांत सोनवणे, डॉ.हर्षवर्धन जाधव,डॉ शशिकांत जोशी,डॉ.माधव भुसनर,प्रा जयेश साळवे, डॉ.जितेंद्र पाटील,प्रा.विजय साळुंखे,डॉ.प्रमोद चौधरी, डॉ.रवी बाळसकर,प्रा वृषाली वाकडे,प्रा वैशाली राठोड, ग्रंथपाल दीपक पाटील,डॉ.बालाजी कांबळे,डॉ विलास गावित,प्रा ज्ञानेश्वर कांबळे,डॉ ज्ञानेश्वर मराठे,डॉ अनिल झळके,प्रा नितेश कोचे,प्रा रोहन गायकवाड, यांच्यासह प्राणिशास्त्र विभागातील डॉ.अशोक पाटील,साबीर शेख, संदीप सोनवणे प्रा.अतुल सैंदाणे यांच्यासह सर्व प्राध्यापक मित्र व शिक्षकेतर वृंद परिवाराने कौतुक व अभिनंदन केले आहे.

