प्रताप महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स विभागात प्रश्न मंजुषा संपन्न..*
![]()
*प्रताप महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स विभागात प्रश्न मंजुषा संपन्न..*
प्रताप महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स विभागातर्फे इलेक्ट्रॉनिक्स प्रश्नमंजुषा स्पर्धा -२०२५ (EQC-२०२५) चे आयोजन प्रथम वर्ष, द्वितीय वर्ष, व तृतीय वर्ष (बी. एस्सी.) च्या विद्यार्थ्यासाठी करण्यात आले. या प्रश्न मंजुषा स्पर्धेत इलेक्ट्रॉनिक्स विषयाशी निगडित स्पर्धात्मक प्रश्न विद्यार्थ्यांना विविध स्वरूपाच्या फेऱ्या घेवून विचारण्यात आले. त्यातून प्रथम, द्वितीय, व तृतीय विद्यार्थी व विद्यार्थिनींची निवड करण्यात आली. तसेच विजेते विद्यार्थ्यांचे सुवर्ण, रजत, तसेच कांस्य पदकाने गौरविण्यात आले व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाचे उद्घाटना प्रसंगी प्रताप महाविद्यालयाचे प्राचार्य व इलेक्ट्रॉनिक्स विभागाचे प्रमुख डॉ.अरुण.बी जैन, तसेच IQAC व RUSA समन्वयक डॉ.मुकेश.पी.भोळे उपस्थित होते.
या प्रसंगी अध्यक्षीय भाषण करतांना प्राचार्यांनी, विद्यार्थ्यांनी अधिकाधिक अशा कार्यक्रमांचा लाभ घ्यावा व आपल्या शैक्षणिक गुणवत्तेत सुधार करून स्वतःच्या उज्वल भविष्यास नवी दिशा द्यावी असे ते म्हणाले.
या कार्यक्रमाच्या समारोपाप्रसंगी अध्यक्ष उपप्राचार्य डॉ. अमित पाटील यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी भाष्य केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभारप्रदर्शन प्रा. वृषाली वाकडे यांनी केले. या कार्यक्रमासाठी प्रा. प्रियंका पाटील यांनी उपस्थिती नोंदविली. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. मुकेश भोळे, प्रा. वृषाली वाकडे, प्रा. वैष्णवी पाटील, प्रा. कल्याणी पाटील, प्रा.अमोल अहिरे, तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी श्री.भगवान पाटील, पंकज भदाने, दीपक चौधरी मंगला पाडवी व तृतीय वर्ष विद्यार्थी (इलेक्ट्रॉनिक्स) यांचे अनमोल सहकार्य लाभले.

